दोन बिबट्यांची झुंज, शेवटी एकाने सोडले प्राण; पाडळपुरात काय घडलं?

| Updated on: Feb 19, 2023 | 9:38 AM

दोन बिबटे असल्याने आपसांत झुंज झाली. त्यात एका बिबट्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर हा भाग आहे. हद्द एकमेकांची असल्यामुळं पिंजरा लावून पकडण्यासाठी निर्बंध असतात.

दोन बिबट्यांची झुंज, शेवटी एकाने सोडले प्राण; पाडळपुरात काय घडलं?
Follow us on

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील पाडळपूर रस्त्यावरील पुलाजवळ नाल्यात बिबट्या मृतावस्थेत आढळला. दोन बिबट्यांचे झुंजीत या बिबट्याचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज आहे. तळोदा तालुक्यातील रांझनी गावाजवळ पाडळपुर रस्त्यावरील पुलाजवळ नाल्यात बिबट्या मृतावस्थेत आढळला. मृतक बिबट्याचे वय दीड वर्ष असल्याचा अंदाज आहे. पाडळपूर रस्त्यावर पहाटेच्या वेळी बिबट्यांची झुंज होत असल्याचा आवाज येत होता, असे ग्रामस्थांनी सांगितले. बिबट्या प्रवीण कदम यांच्या शेताजवळील नाल्यात मृतावस्थेत आढळला. रात्रीची घटना असल्यामुळे त्यांच्यातील वाद सोडवणे शक्य नव्हते. दुसरा बिबट्या कुठं दडून बसला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरा बिबट्या केव्हाही हल्ला करू शकतो. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

शवविच्छेदनानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार

घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरल्यानंतर ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास नवले यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर वनविभागाने बिबट्यावर अंत्यसंस्कार केले. पाडळपूर परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर आहे. जीवितहानी होत असते. शेळ्या किंवा गायींची शिकार होत असते. हा भाग गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवर आहे.

गावात वन्यप्राणी शिरण्याचे प्रमाण

दोन बिबटे असल्याने आपसांत झुंज झाली. त्यात एका बिबट्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर हा भाग आहे. हद्द एकमेकांची असल्यामुळं पिंजरा लावून पकडण्यासाठी निर्बंध असतात. या परिसरात केळी, ऊसाची लागवड केली जाते. मोठे पीक असल्याने वन्यप्राणी लवकर दिसत नाही. शेतीलगत गाव असल्याने गावात वन्यप्राणी शिरण्याचे प्रमाण जास्त आहे. शेळी, गाय यांच्यावर हल्ला होत असतो.

बिबट्यांची झुंज होत असल्याचा आवाज

पाडळपूर रस्त्यावरील पुलाजवळ ही घटना घडली. तळोदा तालुक्यातील रांझनी गावाजवळ हा पुल आहे. या पुलाजवळील नाल्यात बिबट्या मृतावस्थेत आढळला. मृतक बिबट्याचे वय दीड वर्ष आहे. पहाटेच्या वेळी बिबट्यांची झुंज होत असल्याचा आवाज येत होता. त्यात बिबट्याचा मृत्यू झाला असेल, असं गावकऱ्यांनी सांगितलं. शवविच्छेदनानंतर बिबट्याच्या मृत्यूचे नेमकं कारण समोर येईल.