शिंदे यांना काय समजून चुकलं, माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं

| Updated on: Nov 16, 2022 | 9:52 PM

शिंदे गट हा काही पक्ष नाही. कुठला पक्ष, कोणत्या पक्षात राहणार आहेत.

शिंदे यांना काय समजून चुकलं, माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं
Follow us on

वाशिम : भारत जोडो यात्रा ही विदर्भात पोहचली आहे. वाशिम जिल्ह्यानंतर ही यात्रा आता अकोला जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवावी, अशी शेवाळे यांची मागणी आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे म्हणाले, राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं सर्व विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळं आता कसं होणार, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. कन्याकुमारी ते श्रीनगर अशी त्यांची भारत जोडो यात्रा आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे राहुल गांधी यांनी हाती घेतले आहेत. संविधानाला नख लावण्याचा प्रयत्न भाजपकडून होतो आहे, अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी केली.

शिंदे गट हा काही पक्ष नाही. कुठला पक्ष, कोणत्या पक्षात राहणार आहेत. ते स्वतः अस्थीर आहेत. त्यामुळं अशाप्रकारच्या स्टेट्समेंट अपेक्षित असतात. भविष्यात कुठं थारा मिळणार नाही, हे शिंदे यांना समजून चुकलं आहे.

राजू वाघमारे म्हणाले, ज्यांनी भारताला तोडण्याचा संकल्प आहे. त्या लोकांबरोबर राहुल शेवाळे आहेत. त्यामुळं वाण नाही, पण, गुण राहुल शेवाळे यांना आला आहे.

ही यात्रा आम्ही जोडण्यासाठी करतो. केंद्रामध्ये तोडणारी शक्ती बसली आहे. राहुल शेवाळे यांना मंत्री बनायचं. त्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टी चालायच्याच असंही राजू वाघमारे यांना सांगितलं.