Nalasopara Youth Injured : नालासोपाऱ्यात उघड्या चेंबरमध्ये पडून तरुण गंभीर जखमी

| Updated on: Jun 02, 2022 | 9:52 PM

नालासोपारा पूर्व 90 फिट रोडवरील गटाराचे झाकण उघडे असल्याने काल रात्री 8 च्या सुमारास हा तरुण गटारात पडला. त्याच्या पायाला, हाताला, कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तात्काळ बाजूच्या रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले आहेत. वसई-विरार नालासोपारा शहरातील मुख्य रस्त्यावरील गटारांचे अनेक झाकण उघडे आहेत.

Nalasopara Youth Injured : नालासोपाऱ्यात उघड्या चेंबरमध्ये पडून तरुण गंभीर जखमी
नालासोपाऱ्यात उघड्या चेंबरमध्ये पडून तरुण गंभीर जखमी
Image Credit source: TV9
Follow us on

नालासोपारा : वसई-विरार महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे नालासोपाऱ्यात गटाराच्या उघड्या चेंबर (Chember)मध्ये पडून एक 19 वर्षीय तरुण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना बुधवारी रात्री 8 च्या सुमारास घडली आहे. या घटनेत तरुणांच्या कंबरेला, पायाला, डोक्याला जखमा झाल्या असून, त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले आहे. कृतीक महाजन (19) असे गटारात पडून जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. वसई विरार महापालिकेने पावसाळापूर्वीची नालेसफाई, उघडे चेंबर दुरुस्त करणे गरजेचे आहेत. पण पावसाळा सुरू होण्याची वेळ आली तरी महापालिका मात्र निद्रिस्थ अवस्थेत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गटाराचे झाकण उघडे असल्याने घडला अपघात

नालासोपारा पूर्व 90 फिट रोडवरील गटाराचे झाकण उघडे असल्याने काल रात्री 8 च्या सुमारास हा तरुण गटारात पडला. त्याच्या पायाला, हाताला, कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तात्काळ बाजूच्या रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले आहेत. वसई-विरार नालासोपारा शहरातील मुख्य रस्त्यावरील गटारांचे अनेक झाकण उघडे आहेत. महिला, पुरुष, लहान मुले, वयोवृद्ध नागरिक रस्त्यालगतच्या फुटपाथवरुन ये जा करतात. त्यामुळे अन्य दुसरेही अपघात होण्याची शक्यता आहे. निद्रिस्थ असणाऱ्या पालिका प्रशासनाने जागे होऊन, लवकरात लवकर गटावरील झाकण बसवण्याची मागणी स्थानिक लोक करत आहेत.

दिव्यात लोकलच्या धडकेत दोघांचा मृत्यू

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात लोकलच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रेल्वे रूळ ओलांडताना या दोघांना फास्ट लोकलने उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला. दिवा रेल्वे स्थानकात आज सकाळी 8 वाजून 21 मिनिटांची खोपोली फास्ट लोकल पास होत होती. ही लोकल येत असताना तीन जण रेल्वे रूळ ओलांडत होते. या तिघांना फास्ट लोकलनं उडवलं. यात दीपक सावंत (26) आणि गीता शिंदे (35) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर महादेवी जाधव (25) या गंभीर जखमी झाल्या. यानंतर या तिघांनाही कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला नेण्यात आलं. (Young seriously injured after falling into open chamber in Nalasopara)