मच्छिमारांच्या निकामी जाळ्यात अडकलेल्या सापांना जीवदान; जखमी सापांवरही उपचार

| Updated on: Apr 04, 2022 | 7:23 PM

वसई: वसई, विरारसह मुंबईच्या विविध भागांतील समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांच्या (Fisherman) निकामी जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ सापाना रेस्क्यू करून, त्यांना जीवदान दिले आहे. मच्छिमारांच्या जाळयात साप (snake) अडकल्याने अनेक सापांच्या शरीराला जखमा झाल्या होत्या. त्या जखमांवर औषधोपचार करुन त्यांना जीवदान देण्यात आले. वेगवेगळ्या जातीचे साप जाळ्यात अडकले होते. त्यांना त्यातून बाहेर पडता आले नाही मात्र स्वतः बाहेर […]

मच्छिमारांच्या निकामी जाळ्यात अडकलेल्या सापांना जीवदान; जखमी सापांवरही उपचार
मच्छिमारांच्या जाळ्यात अडकलेल्या सापांना जीवदान
Image Credit source: TV9
Follow us on

वसई: वसई, विरारसह मुंबईच्या विविध भागांतील समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांच्या (Fisherman) निकामी जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ सापाना रेस्क्यू करून, त्यांना जीवदान दिले आहे. मच्छिमारांच्या जाळयात साप (snake) अडकल्याने अनेक सापांच्या शरीराला जखमा झाल्या होत्या. त्या जखमांवर औषधोपचार करुन त्यांना जीवदान देण्यात आले. वेगवेगळ्या जातीचे साप जाळ्यात अडकले होते. त्यांना त्यातून बाहेर पडता आले नाही मात्र स्वतः बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असताना जाळ्यामुळे त्यांच्या शरीराला जखमा झाल्या होत्या. जखमी सापांवर उपचार करत असताना त्यांना अलगदरणे जाळ्यात बाहेर काढून हळूवारपणे त्यांच्यावर उपचार केले गेले. अम्मा केअर फाउंडेशन आणि एनिमल्स वेल्फेअरच्या (Amma Care Foundation and Animals Welfare) मदतीने या प्राण्यांना जीवदान देण्यात आले.

सापांना जीवदान मिळाले

समुद्र किनाऱ्याजवळ ठेवलेल्या मच्छिमारांच्या जाळ्यात अडकलेल्या सापांवर उपचार करुन त्यांना जंगलात सोडण्यात आले. मुंबईतील अम्मा केअर फाउंडेशन, एनिमल्स वेल्फेअर सोसायटीच्या स्वयंसेवकांनी जाळ्यात अडकलेल्या सापांना जीवनदान देऊ न त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. त्यामुळे जाळ्यात अडकलेल्या सापांना जीवदान मिळाले आहे. ते साप जाळ्यात अडकून राहिले असते तर त्यांच्या जीवाला धोका होता. अम्मा केअर फाउंडेशन आणि एनिमल्स वेल्फेअरच्या मदतीने सापांवर उपचार केले गेले. त्यामुळे सापासारख्या प्राण्यावरही काळजीपूर्वक काळजी करुन त्यांना जंगलात सोडण्यात आले.

रेस्क्यू करुन सापांची सुटका

मच्छिमारांच्या जाळ्यात अडकलेले हे साप मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील आहेत. विविध भागात साप परिसरात फिरताना ते जाळ्यात अडकले होते. त्या सापांना रेस्क्यू करुन त्यांची सुटका करण्यात आली. काही वेळी जाळ्यात अडकलेल्या सापांना बघून लोक घाबरून त्यांच्या वर हल्ला करतात. त्यामुळे सापांना मारहाण करुन ठार केले जाते. त्यामुळे

वनविभागतील कर्मचार्‍यांचे मार्गदर्शन

मानद वन्यजीव रक्षक सुनीश सुब्रमण्यन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बचाव करण्यात आलेले साप दुर्मिळ जातीचे आहेत. घोणस, नाग, अजगर, धामण, दिवड यासारख्या विषारी आणि बिनविषारी साप होते. मच्छिमारांच्या या जाळ्यात अडकलेल्या सापांना हलक्या हाताने जाळ्यातून काढण्यात आले. त्यानंतर या सापांना वनविभागतील कर्मचार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करून त्यांच्या निरीक्षणांतर्गत ठेवण्यात आले होते. औषधोपचार करुन त्यांच्या जखमा बऱ्या झाल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

EV Charging Stations: आता पेट्रोल पंपांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन्स, कोणत्या भागात किती चार्जिंग स्टेशन्स?; वाचा एका क्लिकवर

Navi Mumbai मध्ये जबाबदारी नाईकांवर सोपवण्याची शक्यता, गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे संघर्ष सुरू

Solapur Accident : पंढरपुरातून पांडुरंगाचं दर्शन घेऊन परतानाना काळाचा घाला! दोघे भाऊ मृत्युमुखी