AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Accident : पंढरपुरातून पांडुरंगाचं दर्शन घेऊन परतानाना काळाचा घाला! दोघे भाऊ मृत्युमुखी

Pandharpur Accident : या अपघातात सोलापूर पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. दयानंद बेलाळे असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Solapur Accident : पंढरपुरातून पांडुरंगाचं दर्शन घेऊन परतानाना काळाचा घाला! दोघे भाऊ मृत्युमुखी
सोलापुरात भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 7:13 PM
Share

सोलापूर : सोलापूरमधील मोहोळ (Solapur Road Accident) तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन (Pandharpur Vitthal Rukhmini Temple) घेऊन परतत असताना बेल्लाळे कुटुंबीयांचा अपघात झाला असून या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात सोलापूर पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. दयानंद बेल्लाळे असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिस कर्मचारी दयानंद बेलाळे यांच्यासह त्याचा भाऊ सचिन बेल्लाळे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहोळमध्ये (Mohol Accident) अपघाताची ही भीषण घटना घडली आहे. दोघांच्या मृत्यूसह दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मोहोळ तालुक्यातील सारोळी पाटीनजीक हा भीषण अपघात झाला. या अपघातात बल्लाळे यांची पत्नी आणि आणि भावयज गंभीर जखमी झाल्या आहेत. रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला.

भीषण!

या अपघाताची दृश्यं थरकाप उडवणारी आहेत. या अपघातामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारची समोरची बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. तर समोर बसलेल्या चालकासह बाजूला बसलेल्याचाही जागीच मृत्यू झाला आहे. या नंतर गाडीतच अडकलेला बेल्लाळे यांचा मृतदेह पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं बाहेर काढलाय.

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भरधाव कारनं धडक दिली. त्यात बेल्लाळे बंधूंचा जागीच जीव गेला आहे. या अपघातामुळे बेल्लाळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन झाल्यानं बेल्लाळे बंधू आपल्या परतले होते. मात्र परतत असतानाच झालेल्या अपघातानं संपूर्ण बेल्लाळे कुटुंबीय हादरुन गेले आहेत.

जखमींवर उपचार

दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या दयानंद बेल्लाळे आणि त्यांच्या भावजयीवर उपचार सुरु आहेत. या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत.

अपघातातील मृतांची नाव पुढीलप्रमाणे :

  1. दयानंद बेल्लाळे
  2. सचिन बेल्लाळे

संबंधित बातम्या :

वृद्ध बहिणीची भेट घेतली, हॉटेलमध्ये जेवण केले,घरी परतताना मायलेकीवर काळाचा घाला

सोलापुरात दुचाकीची कंटेनरला धडक, एकाचा मृत्यू, जमावानं आरटीओ पथकाला बेदम बदडलं

सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात; 4 जण ठार, 6 गंभीर जखमी

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.