Solapur Accident : सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात; 4 जण ठार, 6 गंभीर जखमी

मृतांमध्ये 2 पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघातातील सर्व वारकरी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावचे रहिवासी आहेत. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडीजवळ भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

Solapur Accident : सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात; 4 जण ठार, 6 गंभीर जखमी
सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला भीषण अपघातImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 7:23 AM

सोलापूर : वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला मालट्रकने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात (Accident) झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूरमध्ये घडली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू (Death) झाला असून जवळपास 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये 2 पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघातातील सर्व वारकरी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावचे रहिवासी आहेत. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडीजवळ भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. घटनास्थळी स्थानिक पोलिस दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे. (Terrible accident in a truck and Warkari’s tracker in Solapur)

एकादशीनिमित्त पंढरपूरला दर्शनासाठी चालले होते वारकरी

तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावातील 22 वारकरी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून पंढरपूरला चालले होते. सोमवारी एकादशी असल्याने हे वारकरी पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी चालले होते. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडीजवळ ट्रॅक्टर येताच मागून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू ट्रकने या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्टर ट्रॉली 500 ते 600 फूट अंतरापर्यंत फरपटत गेली. यामध्ये 4 वारकऱ्यांचा मृ्त्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. अपघातातील रुग्णांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

परभणीत बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात

बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन यात तीन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे घडली आहे. सिंगठाणा वळण रस्त्यावर बस-दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. अपघातात दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झालेत, तर दोघे जखमी झाले आहेत. अतिक तांबटकरी (20), शेख अमीर (18), मोहजीब शेख (20) अशी अपघातात ठार झालेल्यांनी नावे आहेत. वसिम शेख (30) आणि विखार शेख (30) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. हे सर्व जण सेलू शहरातील राज मोहल्ला येथील रहिवासी असल्याची माहिती कळते. (Terrible accident in a truck and Warkari’s tracker in Solapur)

इतर बातम्या

Bhiwandi Crime : 45 लाख लूट प्रकरणी पुणे येथील तीन पोलिसांसह चौघांना अटक

दारूच्या नशेत पठ्ठ्याने असं काही केलं की नागरिकांसह पोलीसही चक्रावले! वसईत नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.