AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amaravati Drown Death : अमरावतीत शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू, दिवसभरात पाच जणांनी गमावले प्राण

शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह शेततळ्या बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे शोध व बचाव पथक हे अमरावती अचलपूरमध्ये दाखल झाले आहेत. अमरावतीत आज विविध घटनेत एकूण पाच जणांचा दिवसभरात बुडून मृत्यू झाला आहे.

Amaravati Drown Death : अमरावतीत शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू, दिवसभरात पाच जणांनी गमावले प्राण
डोंबिवलीत खदाणीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यूImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 12:03 AM
Share

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कुष्टा गावातील शेततळ्यात बुडून (Drowned) दोघांचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. हर्षला विनोद वांगे (13) आणि बाजीराव मुन्ना कासदेकर (25) अशी शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहे. हर्षाली विनोद वांगे ही शेततळ्यात पडली असता तिला वाचवणसाठी बाजीराव कासदेकरने उडी घेतली. मात्र त्याचाही बुडून मृत्यू झाला. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून याबाबत अधिक तपास करत आहेत. शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह शेततळ्या बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे शोध व बचाव पथक हे अमरावती अचलपूरमध्ये दाखल झाले आहेत. अमरावतीत आज विविध घटनेत एकूण पाच जणांचा दिवसभरात बुडून मृत्यू झाला आहे. (Five people have drowned in a day in Amravati)

जुन्नरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावात कोल्हापुरी पद्धतीने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. तीनही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. साहिल रंगनाथ घोडे (14), मयुर रामदास घोडे (11) , आनंद विजय खाडे(7) अशी मृत मुलांची नावे आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ऊसतोड कामगारांच्या 3 मुलांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू

कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेलेल्या ऊस तोडणी मजुराच्या तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये घडली. मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे ही घटना घडली. आष्टी येथील व्यवहारे वस्तीवर लोकनेते साखर कारखान्याच्या ऊस तोडणी मजुरांची पालं पडली आहेत. त्यात परभणी जिल्ह्यातील गायकवाड आणि जाधव परिवारातील सदस्य ऊस तोडणी कामगार म्हणून कामाला आले आहेत. शुक्रवारी सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे ऊस तोडणी मजूर मुलांना कोप्यांवर ठेवून फडावर गेले. त्यानंतर पालावरील रेणुका अंकुश जाधव (17) आणि तिचा चुलत भाऊ अजय बाळू जाधव (5) आणि सुरेखा हिरामत गायकवाड असे तिघे ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेले अन् ओढ्याच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. (Five people have drowned in a day in Amravati)

इतर बातम्या

कल्याण डोंबिवलीत 24 तासात चार ठिकाणी आगीचा भडका, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात, 8 ते 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.