AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण डोंबिवलीत 24 तासात चार ठिकाणी आगीचा भडका, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

गेल्या 24 तासात काल रात्रीच्या सुमारास डोंबिवलीमधील उंबारली टेकडी, आधारवाडी येथील डंपिंग ग्राऊंडला किरकोळ स्वरूपात आग लागली. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास खंबाळपाडा येथील बाबूंच्या साठ्याला व सायंकाळी खंबाळपाडा येथील एका पुठ्ठ्याच्या गोडऊनला आग लागल्याची घटना घडली.

कल्याण डोंबिवलीत 24 तासात चार ठिकाणी आगीचा भडका, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
कल्याण डोंबिवलीत 24 तासात चार ठिकाणी आगीचा भडका
| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 11:37 PM
Share

कल्याण : खंबाळपाडा परिसरातील एका पुठ्ठ्याच्या गोडाऊन (Godown)ला आज सायंकाळच्या सुमारास अचानक आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोडाऊनचे मात्र नुकसान झाले आहे. दरम्यान गेल्या 24 तासात काल रात्रीच्या सुमारास डोंबिवलीमधील उंबारली टेकडी, आधारवाडी येथील डंपिंग ग्राऊंडला किरकोळ स्वरूपात आग लागली. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास खंबाळपाडा येथील बाबूंच्या साठ्याला व सायंकाळी खंबाळपाडा येथील एका पुठ्ठ्याच्या गोडऊनला आग लागल्याची घटना घडल्याने केडीएमसीच्या अग्निशमन विभागाची मात्र चांगलीच दमछाक झाली. (In Kalyan Dombivali, fire broke out in four places in 24 hours, Success in controlling fire)

शनिवारी रात्री दोन ठिकाणी लागली होती आग

डोंबिवलीजवळ असलेल्या उंबारली टेकडीवर काल रात्रीच्या सुमारास वणवा भडकला होता. तासाभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले. त्यानंतर कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीवर अग्निशमन विभागाने तात्काळ नियंत्रण मिळवले. त्यानंतर डोंबिवली पुर्वेकडील खंबाळपाडा परिसरात शाळेजवळ असलेल्या एका जागेवर बांबुचा साठा करून ठेवण्यात आला होता. आज दुपारच्या सुमारास अचानक बांबूला आग लागली. क्षणर्धात या आगीने रौद्र रूप धारण केले. शेजारीच उभ्या असलेल्या ट्रकला देखील या आगीची झळ बसली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

गोडाऊनमध्ये कुणीही नसल्याने जीवितहानी टळली

या घटनेला काही तास उलटत नाही तोच पुन्हा खंबाळपाडा परिसरातील एका पुठ्ठ्याच्या गोडऊनला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने आग लागली तेव्हा गोडाऊनमध्ये कुणी नव्हतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र गेल्या 24 तासात कल्याण-डोंबिवलीत चार ठिकाणी आग लागल्याने अग्निशमन यंत्रणेची मात्र पुरती दमछाक झाल्याचे दिसून आले. (In Kalyan Dombivali, fire broke out in four places in 24 hours, Success in controlling fire)

इतर बातम्या

Bhiwandi Crime : 45 लाख लूट प्रकरणी पुणे येथील तीन पोलिसांसह चौघांना अटक

Parbhani Accident : परभणीत बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात, 3 जण जागीच ठार

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.