AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parbhani Accident : परभणीत बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात, 3 जण जागीच ठार

जिंतूर औरंगाबाद महामार्गावर चारठाणा जवळ सिंगटाळा पाटीवर येलदरी येथून सेलुकडे जात असताना दोन मोटारसायकल व एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने मोटारसायकलवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. सेलू येथील पाच जण दोन मोटारसायकलवरुन रविवारी संध्याकाळी येलदरी येथून सेलुकडे चालले होते.

Parbhani Accident : परभणीत बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात, 3 जण जागीच ठार
परभणीत बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात
| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 9:56 PM
Share

परभणी : बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात (Accident) होऊन यात तीन जण जागीच ठार (Death) झाल्याची दुर्दैवी घटना जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे घडली आहे. सिंगठाणा वळण रस्त्यावर बस-दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. अपघातात दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झालेत, तर दोघे जखमी झाले आहेत. अतिक तांबटकरी (20), शेख अमीर (18), मोहजीब शेख (20) अशी अपघातात ठार झालेल्यांनी नावे आहेत. वसिम शेख (30) आणि विखार शेख (30) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. हे सर्व जण सेलू शहरातील राज मोहल्ला येथील रहिवाली असल्याची माहिती कळते. (A terrible accident bus and two-wheeler in parabhani, 3 killed on the spot)

जखमींवर जिंतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु

जिंतूर औरंगाबाद महामार्गावर चारठाणा जवळ सिंगटाळा पाटीवर येलदरी येथून सेलुकडे जात असताना दोन मोटारसायकल व एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने मोटारसायकलवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. सेलू येथील पाच जण दोन मोटारसायकलवरुन रविवारी संध्याकाळी येलदरी येथून सेलुकडे चालले होते. तर जिंतूर आगाराची बस औरंगाबादवरुन जिंतूरकडे जात होती. यावेळी बस आणि दोन्ही दुचाकींमध्ये चारठाणा येथून थोड्याच अंतरावर असलेल्या सिगटाळा पाटीजवळ समोरा समोर धडक झाली. यात एका मोटारसायकवरील अतिक तांबटकरी, शेख अमीर आणि मोहजीब शेख हे तिघे जागीच ठार झाले.

तर दुसऱ्या मोटारसायकलवरील वसिम शेख आणि विखार शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिंतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती कळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे स.पो.नि बालाजी गायकवाड यांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना जिंतूर प्राथमिक केंद्रात उपचारासाठी हलविले. याबाबत पुढील तपास चारठाणा पोलीस करीत आहेत.

अमरावतीच्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनाला मध्यरात्री भीषण अपघात

अकोला येथे आयोजित काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आटोपून अमरावतीला परत येणाऱ्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या कारला शनिवारी रात्री अकोला-दर्यापूर मार्गावर दर्यापूर नजीक ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये अमरावती युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव रोहित देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. तर तीन काँग्रेसचे पदाधिकारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये युवक काँग्रेसचे नवनिर्वाचीत जिल्हा अध्यक्ष पंकज मोरेंसह माजी आमदार जगताप यांचे पुत्र परीक्षीत जगताप यांचा देखील समावेश असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (A terrible accident bus and two-wheeler in parabhani, 3 killed on the spot)

इतर बातम्या

दारूच्या नशेत पठ्ठ्याने असं काही केलं की नागरिकांसह पोलीसही चक्रावले! वसईत नेमकं काय घडलं?

Mumbai Drugs Siezed : मुंबईत 1 कोटी 95 लाख रुपयांच्या चरससह एका आरोपीला अटक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.