AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Drugs Siezed : मुंबईत 1 कोटी 95 लाख रुपयांच्या चरससह एका आरोपीला अटक

अटक करण्यात आलेल्या आरोपी विजय चौहान हा यूपीतून मुंबईत चरसचा व्यापार करण्यासाठी मुंबईत आला होता. आरोपी दहिसर चेक नाक्याजवळ चरस घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितनुसार दहिसर पोलिसांनी चेक नाक्याजवळ सापळा रचला.

Mumbai Drugs Siezed : मुंबईत 1 कोटी 95 लाख रुपयांच्या चरससह एका आरोपीला अटक
मुंबईत 1 कोटी 95 लाख रुपयांच्या चरससह एका आरोपीला अटक
| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 6:42 PM
Share

मुंबई : मुंबईच्या दहिसर पोलिसांनी 1 कोटी 95 लाख 18 हजार किंमतीच्या 6 किलो 560 ग्रॅम चरस (Charas)सह एका आरोपीला अटक (Arrest) केली आहे. विजय चौहान (32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मुंबईतील मालवणी येथे राहतो. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, आरोपीशी आणखी किती लोक संबंधित आहेत ? कधीपासून हा चरसचा व्यवसाय करत होता, याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत. हा आरोपी यूपीच्या कानपूर येथून चरसचा व्यापार करण्यासाठी मुंबईत आले होते. (One accused arrested in Mumbai with charas worth Rs 1 crore 95 lakh)

पोलिसांनी दहिसर चेकनाक्यावर सापळा रचून आरोपीला अटक केली

अटक करण्यात आलेल्या आरोपी विजय चौहान हा यूपीतून मुंबईत चरसचा व्यापार करण्यासाठी मुंबईत आला होता. आरोपी दहिसर चेक नाक्याजवळ चरस घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितनुसार दहिसर पोलिसांनी चेक नाक्याजवळ सापळा रचला. आरोपी ठरल्याप्रमाणे चरस घेऊन दहिसर चेक नाक्याजवळ आला असता पोलिसांनी करोडो रुपयांच्या चरससह आरोपीला रंगेहाथ पकडले. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. महिनाभरापूर्वी दहिसर परिसरातून दोन ड्रग्ज तस्करांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून 3 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला होता.

मुंबईत याआधीही पोलिसांनी ड्रग्ज जप्त केले

मुंबईत याआधीही अंमली विरोधी पथकाने वडाळा परिसरात कारवाई करत 39 लाख 63 हजार रूपयांचे ड्रग्स जप्त केले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. आरोपींकडून 1 किलो 321 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीवर तब्बल 10 गुन्हे दाखल आहेत. इकबाल शेख आणि जहांगीर खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (One accused arrested in Mumbai with charas worth Rs 1 crore 95 lakh)

इतर बातम्या

गर्भवती महिलेवर बलात्कार करत तिघांची हत्या, ब्रिटनमधील ‘त्या’ नराधमाला जन्मठेप

Pune Crime| पुण्यात तुझ्या-माझ्या लफड्याविषयी’ घरी सांगेन म्हणत अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुटलं

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.