AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भवती महिलेवर बलात्कार करत तिघांची हत्या, ब्रिटनमधील ‘त्या’ नराधमाला जन्मठेप

अँथनी रसेलला 2020 मध्ये निकोल मॅकग्रेगरवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. निकोल त्यावेळी 5 महिन्यांची गर्भवती होती. बलात्कारानंतर रसेलने निकोलची गळा दाबून हत्या केली होती. वॉर्विक क्राउन कोर्टात शिक्षा सुनावताना न्यायमूर्तींनी ही ‘असाधारण गंभीर’ बाब असल्याचे म्हटले होते.

गर्भवती महिलेवर बलात्कार करत तिघांची हत्या, ब्रिटनमधील 'त्या' नराधमाला जन्मठेप
कुख्यात गुंड आणि मोक्काच्या आरोपींच्या संपत्तीवर नागपूर पोलिसांची कारवाई
| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 5:55 PM
Share

ब्रिटन : ब्रिटनच्या वेस्ट मिडलँड्स (West Midlands)मध्ये गर्भवती महिलेवर बलात्कार करून तिच्यासह तिघांची हत्या करणाऱ्या नराधमाला ब्रिटनमधील वॉर्विक क्राउन न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या आरोपीने सहा दिवसात तिघांच्या हत्या केल्या होत्या. अँथनी रसेल (Anthony Russell) असे या आरोपीचे नाव आहे. तर ज्युली विल्यम्स (58), त्याचा मुलगा डेव्हिड विल्यम्स (31) आणि निकोल मॅकग्रेगर (31) अशी हत्या करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. नराधमाने सहा दिवसात या तिघांची हत्या केली होती. (Accused of raping pregnant woman and killing three sentenced to life imprisonment)

अँथनी रसेलला 2020 मध्ये निकोल मॅकग्रेगरवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. निकोल त्यावेळी 5 महिन्यांची गर्भवती होती. बलात्कारानंतर रसेलने निकोलची गळा दाबून हत्या केली होती. वॉर्विक क्राउन कोर्टात शिक्षा सुनावताना न्यायमूर्तींनी ही ‘असाधारण गंभीर’ बाब असल्याचे म्हटले होते.

तिघेही अचानक बेपत्ता आणि काही दिवसांनी मृतदेह सापडले

मयत ज्युली विल्यम्स यांनी 23 ऑक्टोबर 2020 रोजी आपला मुलगा डेव्हिडच्या हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दोन दिवसांनंतर, ज्युली बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या बहिणीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांना ज्युलीचा मृतदेह सापडला. त्यांच्या शरीरावर 100 हून अधिक जखमा होत्या. यानंतर पोलिसांनी डेविडचाही मृतदेह सापडला. या हत्याकांडानंतर अँथनीने लूट करुन शहरातून पळ काढला. लेमिंग्टन शहरात आल्यानंतर काही तासांनी त्याने निकोल मॅकग्रेगरवर बलात्कार करत तिची हत्या केली. काही दिवसांनी निकोलचा मृतदेह घनदाट जंगलात सापडला. तिच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा होत्या.

पुण्यात धारदार शस्त्राने वार करत इसमाची आत्महत्या

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथे 9 तारखेला मध्यरात्री अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करत एका इसमाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रोहिदास पाबळे (38) असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी कसून तपास करत स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी या हत्येचा 24 तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. कुणाल बोरुडे आणि सुफियान आतार अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पुढील तपास पुणे ग्रामीण पोलिस करत आहेत. (Accused of raping pregnant woman and killing three sentenced to life imprisonment)

इतर बातम्या

Pune Crime| पुण्यात तुझ्या-माझ्या लफड्याविषयी’ घरी सांगेन म्हणत अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुटलं

Video: जत्रा पहायला गेलेल्या मुलींवर सरेआम लैंगिक अत्याचार! मध्य प्रदेशची टाळकं गरम करणारी घटना

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.