AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beat coin scam: पुण्यात निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यानेच हडपले बिटकॉइन , नेमकं काय घडलं

पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत 2018 मध्ये क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने बऱ्याच जणांना फसविणाऱ्या आरोपींविरुध्द दत्तवाडी पोलीस ठाणे आणि निगडी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद झाली होती. या गुन्ह्यात कोट्यवधी रुपयांचे आभासी चालन जप्त करण्यात आले होते.

Beat coin scam:  पुण्यात निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यानेच हडपले बिटकॉइन , नेमकं काय घडलं
पुणे बिटकॉइन घोटाळा Image Credit source: TV9
| Updated on: Mar 13, 2022 | 1:00 PM
Share

पुणे – देशात  डिजिटल क्रिप्टो करन्सीने (cryptocurrency) अनेकांची फसवणूक केली आहे. पुण्यात (Pune) याचा क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने मोठा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. क्रिप्टो करन्सीशी संबंधित देशात नोंदवण्यात आलेल्या पहिल्या गुन्ह्यात,  जप्त करण्यात आलेले बीटकॉईन (Bitcoin)  परस्पर आपल्या खात्यात वळती करून घेतल्याची घटना उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्हयात तपासासाठी तांत्रिक मदत करणाऱ्या दोन तपास अधिकाऱ्यांनीच हे कृत्य केलं आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी दोन संगणकतज्ञ पंकज प्रकाश घोडे (वय 38, रा. ताडीवाला रोड) आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (वय 45, रा. बिबवेवाडी) याना अटक केल आहे. या दोघांनी तब्बल 20  कोटी रुपयांचे बिटकॉइन हडप केल्याचं समोर आलं आहे.

तांत्रिक तज्ज्ञ म्हणून काम करताना केली फसवणूक

पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत 2018 मध्ये क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने बऱ्याच जणांना फसविणाऱ्या आरोपींविरुध्द दत्तवाडी पोलीस ठाणे आणि निगडी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद झाली होती. क्रिप्टो करन्सी संदर्भात पहिला गुन्हा पुणे शहरात 2018 मध्ये दाखल झाला होता. या गुन्ह्यातील कोट्यवधी रुपयांचे आभासी चालन जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी तांत्रिक तज्ज्ञ म्हणून या दोघांची मदत घेतली होती. मात्र या दोघांनी पोलिसांची दिशाभूल करत क्रिप्टो करन्सी स्वत:च्या व इतर अन्य साथीदारांच्या वॉलेटमध्ये परस्पर वळवून घेतल्याचे उघड झाले आहे.

असा झाला उलगडा

आरोपींकडून क्रिप्टो करन्सी जप्त करताना तांत्रिक तज्ज्ञांनी संशयास्पद वागत असल्याचा संशय राज्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे अपर पोलीस महासंचालकांना आला. याबाबत त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्या चौकशीत तांत्रिक पुराव्यावरुन त्यांचे के वाय सीवरुन या दोघांनी परस्पर क्रिप्टो करन्सी व मोबाईल, मॅकबुक, हार्ड डिस्क, टॅब, लॅपटॉप, सिडी, पेन्ड्राईव्ह, मेमरी कार्ड, स्मार्ट वॉच, हॉटस्पॉट, सीडी, इंटरनेट डोंगल अशा विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने दोघांना 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

महावितरणचा ‘शॉक’ फळबागांनाही, अस्मानी संकटानंतर आता सुल्तानी संकटाशी सामना

मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण केव्हापर्यंत, सुनील केदारांनी सांगितली तारीख

प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आसनसोलमधून पोटनिवडणूक लढणार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.