मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण केव्हापर्यंत, सुनील केदारांनी सांगितली तारीख

बालेवाडी क्रीडा संकुलाप्रमाणे मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल अद्ययावतीकरणाचे काम चालू आहे. या कामास गती द्यावी, अशा सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी क्रीडा विभागाला दिल्या. विभागीय क्रीडा संकुलाच्या अद्ययावतीकरणाबाबत आढावा केदार यांनी घेतला.

मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण केव्हापर्यंत, सुनील केदारांनी सांगितली तारीख
बैठकीत उपस्थित क्रीडा मंत्री सुनील केदार, बाजूला अधिकारी. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 12:32 PM

नागपूर : मुंबईच्या धर्तीवर शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करा, स्क्वाश खेळासाठी विशेष भर देऊन नागपुरात या खेळाला खेळाडूंकडून जास्तीत जास्त प्रतिसाद कसा प्राप्त होईल यासाठी प्रयत्नशिल असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार (Sports and Youth Welfare Minister Sunil Kedar) म्हणाले. शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामाच्या बदल्यात क्रीडा विभागाची 21 एकर जागा कंत्राटदारांना 30 वर्षासाठी लिजवर दिल्यास काम गतीने होईल. निधीचा प्रश्न संपुष्टात येईल. 30 वर्षानंतर ती जागा पुन्हा शासनास वापरासाठी मिळेल, असे उपसंचालकांनी सांगितले. याबाबत विचार करून नंतरच त्यास मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. उपसंचालक शेखर पाटील (Deputy Director Shekhar Patil), जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, आर्किटेक्चर श्री. भिसे, एनसीसीचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. येत्या 31 डिसेंबर 2023 पर्यंत मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या (Divisional Sports Complex) अद्यावतीकरणाचे काम पूर्ण होईल. यानुसार नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कामाचा आराखडा लवकरात लवकर तयार करुन कामास सुरुवात करा. बांधकामात स्पोर्टस कल्बचा समावेश करा. काही तांत्रिक अडचणी आल्यास स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात लवकरच एरो मॉडेलिंग शो

संकुलातील वॉशरुम पंचतारकित हॉटेल्सप्रमाणे करा. सांडपाणी व्यवस्थापन योग्य करा. जेणेकरुन संकुल परिसरात अस्वच्छता राहणार नाही याची दक्षता घ्या, असेही केदार यांनी यावेळी सांगितले. कमर्शियल कॉम्प्लेक्स, फुटबॉलसाठी ओपन स्टेडियम व पहिल्या मजल्यावर हॉकी मैदान या संकुलात राहणार आहेत. खेळाडूंसाठी दोन वसतिगृह बांधण्यात येणार आहे, असे क्रीडा संचालकांनी सांगितले. नागपूर शहरात लवकरच एरो मॉडेलिंग शो मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे होणार आहे. त्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.

हजारांवर खेळाडू परराज्यातून येणार

यावेळी हॉर्स रायडिंग, सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. एरोमॉडेलिंग शो मध्ये 29 एरोमाडल व 20 होर्स रायडर यांचा सहभाग राहणार आहे. या शोसाठी 1 हजार 200 खेळाडू परराज्य व देशाबाहेरुन येणार आहेत. यासाठी 5 हजार विद्यार्थ्यांसाठी आसनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या शोच्या यशस्वीतेसाठी एनसीसी कॅडेटसह स्कॉऊट व गाईडच्या सदस्यांना त्यात सहभागी करण्याच्या सूचना सुनील केदार यांनी दिल्या. या कार्यक्रमात देशक्तीपर गीतच राहणार याची दक्षता घ्या. वातावरण निर्मिती होण्यासाठी ते महत्वाचे आहे. शेवटी एरोमॉडेलिंग शोच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली.

Photo – अकोल्यात ती आली, तिने जिंकले…, पण वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाले कसे ते पाहा

देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांची नोटीस, अनिल बोंडे यांनी सांगितले यामागील कारण, आता जेलमध्ये जाण्यासाठी कुणाचा नंबर?

Photo – नागपुरात रंगली अनोखी मॅरेथॉन, हजारो मायलेकी धावल्या, माहिला जगताचा लोकजागर

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.