AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime | पुण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचिकवर बलात्कारचाआरोप केलेल्या तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

लग्नाचे आमिष दाखवत 24 वर्षीय तरुणी सोबत शारीरीक संबंध करुन तिला गरोदर केले. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कामगार नेते आणि शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक  याच्या विरोधात पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime | पुण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचिकवर बलात्कारचाआरोप केलेल्या तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Mar 12, 2022 | 5:09 PM
Share

पुणे – शिवसेना नेते रघुनाथ कुचिकवर (ShivSena Raghunath Babanrao Kuchik) बलात्काराचा (Rape case)आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. डेक्कन परिसरातील हॉटेलमध्ये फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयन्त तरुणीने केला आहे. यावेळी तरुणीने फेसबुक पोस्ट करत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी पीडित 24 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित गुन्हा गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल, मॉडेल कॉलनीतील(Modal colony) प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला आहे.याबाबत पोलिसात तक्रार करत कारवाईची मागणी केली होती.

जीवे मारण्याची धमकी

लग्नाचे आमिष दाखवत 24 वर्षीय तरुणी सोबत शारीरीक संबंध करुन तिला गरोदर केले. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कामगार नेते आणि शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक  याच्या विरोधात पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली होती.

काय आहे प्रकरण

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेम संबध होते. त्यांनी तरुणीला विवाहाचे अमिष दाखवले. या प्रेमसंबंधातून त्यांनी तरुणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यातूनच फिर्यादी गरोदर राहिली. पीडित तरुणानी जेव्हा त्यांना आपण गरोदर असल्याची माहिती दिली तेव्हा त्यांनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पडले. इतकेच नव्हे गर्भपात न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगायला अशीही धमकी देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी आजारी असताना त्यांच्याकडून जबरदस्तीने समजूतीचे करारनाम्यावर सह्या करुन घेतली असल्याची माहितीने तरुणी दिली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीकुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

पोलीस जबाब नोंदवण्यासाठी बंगल्यावर जाणार, फडणवीसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबई पोलिसांचं एक पाऊल मागे?

हरविलेला कुत्रा शोधा नि 50 हजार रुपये कमवा! एकीकडं श्वानप्रेम, तर दुसरीकडं तिरस्कार का?

Nandurbar : जाळायचे होते पाचट अन् जळाला ऊस, अवघ्या दोन तासात 12 एकरातील फड जळून खाक

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली