Pune Crime | पुण्यात शिवसेनेचे उपनेता रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल ; लग्नाचे आमिष दाखवत केली फसवणूक

शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेम संबध होते. त्यांनी तरुणीला विवाहाचे अमिष दाखवले. या प्रेमसंबंधातून त्यांनी तरुणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यातूनच फिर्यादी गरोदर राहिली. पीडित तरुणानी जेव्हा त्यांना आपण गरोदर असल्याची माहिती दिली तेव्हा त्यांनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पडले.

Pune Crime | पुण्यात शिवसेनेचे उपनेता रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल ; लग्नाचे आमिष दाखवत केली फसवणूक
crimeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 1:53 PM

पुणे – लग्नाचे आमिष दाखवत 24 वर्षीय तरुणी सोबत शारीरीक संबंध करुन तिला गरोदर केले. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कामगार नेते आणि शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक (ShivSena   Raghunath Babanrao Kuchik) याच्या विरोधात पोलिसात  बलात्काराचा गुन्हा(Rape case) दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी 24 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस सस्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित गुन्हा गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल, मॉडेल कॉलनीतील(Modal colony)   प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला आहे.

नेमक काय घडलं 

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेम संबध होते. त्यांनी तरुणीला विवाहाचे अमिष दाखवले. या प्रेमसंबंधातून त्यांनी तरुणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यातूनच फिर्यादी गरोदर राहिली. पीडित तरुणानी जेव्हा त्यांना आपण गरोदर असल्याची माहिती दिली तेव्हा त्यांनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पडले. इतकेच नव्हे गर्भपात न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगायला अशीही धमकी देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी आजारी असताना त्यांच्याकडून जबरदस्तीने समजूतीचे करारनाम्यावर सह्या करुन घेतली असल्याची माहितीने तरुणी दिली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीकुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

संजय राऊत यांच्या अलिबागमधील जमिनीबाबत माजी सरपंच म्हणतात…

बाई नाही यायची, तेव्हा देवेंद्रजींकडून डोसे बनवून घ्यायचे, अमृतांच्या उत्तरावर संकर्षण म्हणतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

भारतीय हवाई दलात अप्रेंटिसच्या 80 जागांवर भरती, नाशिकमध्ये काम करण्याची संधी

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.