AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारूच्या नशेत पठ्ठ्याने असं काही केलं की नागरिकांसह पोलीसही चक्रावले! वसईत नेमकं काय घडलं?

आनंद नगरच्या मुख्य रस्त्यावर नग्नावस्थेत एकजण कारमध्ये झोपलेल्या अवस्थेत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी कारच्या काचावर मारून उठवण्याचा प्रयत्न केला पण उठला नाही, तेव्हा हा मृतदेह आहे की काय असा नागरिकांना संशय आला. नागरिकांनी पोलिसांना बोलावून तोंडावर पाणी मारले असता तात्काळ उठून बसला.

दारूच्या नशेत पठ्ठ्याने असं काही केलं की नागरिकांसह पोलीसही चक्रावले! वसईत नेमकं काय घडलं?
दारूच्या नशेत पठ्ठ्याने असं काही केलं की नागरिकांसह पोलीसही चक्रावले!
| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 8:13 PM
Share

नालासोपारा : वसईतील आनंद नगर परिसरातील उच्चभ्रू वस्तीत वॅगनआर कार चालका (Car Driver)च्या विकृती (Perverted)चे आज सायंकाळी साडे पाचच्या वेळी दर्शन झाले आहे. मुख्य रस्त्यावर कार पार्क करून, दारूच्या नशेत तर्राट होऊन, अंगावरील सर्व कपडे काढून, नग्नावस्थेत कारमध्ये एसी आणि पार्किंग लाईट लावून एक विकृत झोपला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यावर गाडीत मृतदेह आहे की काय असा संशय आल्याने पोलिसांना बोलावून, तोंडावर पाणी मारले असता तो लगेच उठून बसला. दारूच्या नशेत या विकृत कार चालकाने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. वसईच्या माणिकपूर पोलिसांनी त्याला कारसह ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. (Perverted act of drunk car driver in Vasai, Manikpur police took him into custody)

विकृत कार चालकाची पोलिसांकडून चौकशी सुरु

महेंद्र सिंग असे या विकृत कार चालकाचे नाव आहे. तो नालासोपारा येथील रहिवासी असल्याचे सांगत आहे. वसईचा आनंद नगर परिसर हा उच्यभृ वस्तीचा परिसर आहे. सायंकाळी 5 च्या नंतर अनेक महिला, पुरुष हे आपल्या मुलांना घेऊन घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडत असतात. याचवेळी साडे पाचच्या सुमारास आनंद नगरच्या मुख्य रस्त्यावर नग्नावस्थेत एकजण कारमध्ये झोपलेल्या अवस्थेत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी कारच्या काचावर मारून उठवण्याचा प्रयत्न केला पण उठला नाही, तेव्हा हा मृतदेह आहे की काय असा नागरिकांना संशय आला. नागरिकांनी पोलिसांना बोलावून तोंडावर पाणी मारले असता तात्काळ उठून बसला. पोलिसांनी त्या विकृत कारचालकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी सुरू केली आहे. पण एका रहदारीच्या ठिकाणी या विकृत कारचालकाने असे कृत्य केल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुंबईत 1 कोटी 95 लाख रुपयांचे चरस जप्त

मुंबईच्या दहिसर पोलिसांनी 1 कोटी 95 लाख 18 हजार किंमतीच्या 6 किलो 560 ग्रॅम चरससह एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी यूपीच्या कानपूर येथून चरसचा व्यापार करण्यासाठी मुंबईत आला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच दहिसर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून दहिसर चेक नाक्याजवळ करोडो रुपयांच्या चरससह आरोपीला रंगेहाथ पकडले. विजय चौहान असे अटक आरोपीचे नाव असून तो मुंबईतील मालवणी येथील रहिवासी आहे. (Perverted act of drunk car driver in Vasai, Manikpur police took him into custody)

इतर बातम्या

गर्भवती महिलेवर बलात्कार करत तिघांची हत्या, ब्रिटनमधील ‘त्या’ नराधमाला जन्मठेप

Pune Crime| पुण्यात तुझ्या-माझ्या लफड्याविषयी’ घरी सांगेन म्हणत अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुटलं

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.