AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांनी कारने जाण्याचा निर्णय कुणामुळे बदलला? अखेर पूर्व विदर्भातील नेत्याचं नाव आलं समोर; बड्या नेत्याने घेतलं थेट नाव

अजित पवार यांनी कारने जाण्याचा निर्णय कुणामुळे बदलला? यासंदर्भातला अत्यंत मोठा आणि खळबळजनक दावा एका बड्या नेत्याने केला आहे. याप्रकरणी त्यांनी पूर्व विदर्भातील नेत्याचं नाव घेतलं आहे.

अजितदादांनी कारने जाण्याचा निर्णय कुणामुळे बदलला? अखेर पूर्व विदर्भातील नेत्याचं नाव आलं समोर; बड्या नेत्याने घेतलं थेट नाव
Ajit PawarImage Credit source: Tv9
| Updated on: Feb 12, 2026 | 12:38 PM
Share

सुनील जाधव, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल का कोणाचा तरी फोन आल्यानंतर अजित पवार यांनी प्रवासाचा निर्णय बदलला, असा मोठा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी केला आहे. त्यांनी मंत्रालयातील फाईलसंदर्भात अजितदादांना फोन केला होता. तो फोन आल्यानंतर अजितदादांनी ‘बाय रोड’ म्हणजेच रस्ता मार्गे जाणं रद्द केल्याचा, धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. फाईल्ससंदर्भात फोन केल्यामुळे आधीच गाडीत टाकलेल्या बॅगा पुन्हा उतरवून चार्टर्ड फ्लाइटने जाण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला. ही कागदपत्रे आणण्यासाठी त्यांनी सिक्युरिटीला फोन केला होता. मंत्रालयातून फाईल आणायला सुमारे साडेसात ते आठ वाजते होते. त्यामुळे रात्रीच रोडने जाण्याचा पर्याय रद्द करण्यात आला, असं खळबळजनक वक्तव्य प्रमोद हिंदुराव यांनी केलं आहे.

काय म्हणाले प्रमोद हिंदुराव?

आदल्या दिवशी त्यांची तयारी झाली होती की आपण रोडने जायचं. सर्व बॅग गाडीमध्ये टाकल्या होत्या. प्रफुल पटेल का कोणाचा तरी फोन त्यांना आला होता. माझं काहीतरी काम अडलंय, मंत्रालयात ती फाईल आहे. दादांनी सेक्रेटरी फोन लावून कागदपत्रे सहीसाठी आणायला सांगितलं. परत मी आठवडाभर नाही, निवडणुकीसाठी जाणार आहे, असं ते म्हणाले. ती फाईल आणायला 7.30 ते 8 वाजते होते. परत त्यांनी ड्राइव्हरला सांगितलं की बॅग गाडीबाहेर काढ, आपण चार्टर्ड फ्लाइटने उद्या सकाळी 7.30 का 8 वाजता जायचंय. तेव्हा ड्राइव्हरने गाडीतून सगळ्या बॅग काढल्या.

याविषयी ते पुढे म्हणाले, “दुसऱ्या दिवशी अजितदादांसोबत पाच जण प्रवासाला निघाले होते. त्यात त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव हेसुद्धा होते. ते अजितदादांच्या शेजारीच बसले होते. विदीप जाधव यांनी अजित पवारांसोबत फोटो काढून तो घरच्यांना पाठवला होता. दादांसोबत मी 40 वर्षे समाजासाठी काम केलं. त्यांच्या निधनाच्या दोन दिवस आधीच त्यांची मी प्रत्यक्ष भेट घेतली होती.” प्रमोद हिंदुराव यांच्या या दाव्याने आता नव्या चर्चांना उधाणं आलं आहे. अजित पवारांच्या यांच्या निधनामागचं गूढ अधिकच वाढत जात आहे.

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीसुद्धा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांवर सवाल उपस्थित केला आहे. “अजित पवार गटाचे नेते मूग गिळून गप्प का आहेत? रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांना का पडत नाहीत? सुनील तटकरे, प्रफुल पटेल का गप्प आहेत? सगळे प्रश्न विचारत असताना त्यांचे नेते मात्र बोलत नाहीत. अजित पवार यांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाही हे स्पष्ट होत असताना ते काहीच का बोलत नाहीत,” असा प्रश्न लवांडे यांनी मांडला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी बारामती इथं भीषण विमान अपघातात निधन झालं. ते पाच जणांसह चार्टर्ड फ्लाइटने बारामतीला जात असताना लँडिंगदरम्यान ते विमान कोसळलं. या अपघातात पायलटसह विमानातील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

Follow Us
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण