AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता… बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

| Updated on: Aug 16, 2026 | 10:11 AM
Share

राज्याच्या राजकारणात नेहमीच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय तसेच कौटुंबिक वाद समोर येत असतात. अशात अशात आता दोन्ही नेत्यांनी बीडमधील एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय तसेच कौटुंबिक वाद आता पूर्णपणे मिटल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. भावा-बहिणीतला, कुटुंबातला आणि पक्षातला संघर्ष आता संपुष्टात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेनंतर धनंजय मुंडे यांनीही आपले समाधान व्यक्त केले आहे. या संदर्भात बोलताना धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले की, कधीकधी आपसातील संघर्ष आपल्या लोकांच्या विकासाला खुंटवत असतो.

आज या मंचावर हा आपसातील संघर्ष मिटलेला पाहून मला आनंद होत आहे. माझ्या भावा-बहिणीतला, आमच्या दोन , दोनघ घरांमधला,  कुटुंबांमधला आणि दोन पक्षांमधला संघर्ष मिटला असल्याचे त्यांनी सांगितले. या सलोख्याच्या निमित्ताने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आवडीच्या पशुधनाशी संबंधित महाविद्यालयाचे भूमीपूजन करण्यात आले. वडिलांचे एखादे स्वप्न किंवा काम पूर्ण झाल्यावर मिळणारे समाधान मोठे असते. हे समाधान आज पंकजा मुंडे आणि माझ्या मनात नक्कीच आहे, असे धनंजय मुंडे यांनी नमूद केले. या सलोख्यामुळे आता लोकांच्या विकासाला अधिक प्राधान्य दिले जाईल, असे संकेत दोन्ही नेत्यांनी दिले आहेत.

Published on: Aug 16, 2026 10:11 AM

Follow Us