मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांना उशीर
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज, रविवारी मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणा दुरुस्ती आणि रेल्वे रुळांची देखभाल करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर, ठाणे ते कल्याण दरम्यान जलद डाउन दिशेच्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. ठाण्याहून कल्याणकडे जाणाऱ्या जलद लोकल धीम्या मार्गावर […]
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज, रविवारी मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणा दुरुस्ती आणि रेल्वे रुळांची देखभाल करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर, ठाणे ते कल्याण दरम्यान जलद डाउन दिशेच्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. ठाण्याहून कल्याणकडे जाणाऱ्या जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे प्रवाशांना सुमारे १० ते १५ मिनिटांचा उशीर होण्याची शक्यता मध्य रेल्वेने वर्तवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाण्यापर्यंतची जलद वाहतूक सुरळीत राहील.
हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असेल. वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत वाहतूक सुरळीत असली तरी, ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेल ते ठाणे वाहतूक बंद राहील. वाशी ते ठाणे आणि नेरुळ ते ठाणे वाहतूक मात्र नियमित सुरू राहील. पावसाळ्यातील देखभालीसाठी आणि लोकल उशिरा धावत असल्याने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही १० ते १५ मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे.
Published on: Aug 16, 2026 08:27 AM
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त

