AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinod Kambli Biopic: क्रिकेटमधील संघर्ष, Love Life, व्यसन.., विनोद कांबळीच्या आयुष्यावर बायोपिक, कोणत्या अभिनेत्याची वर्णी?

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि स्टार फलंदाज विनोद कांबळी यांचे जीवन आता चित्रपटातून नव्हे, तर वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

Vinod Kambli Biopic: क्रिकेटमधील संघर्ष, Love Life, व्यसन.., विनोद कांबळीच्या आयुष्यावर बायोपिक, कोणत्या अभिनेत्याची वर्णी?
| Updated on: Aug 16, 2026 | 10:31 AM
Share

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि स्टार फलंदाज विनोद कांबळी यांचे जीवन आता चित्रपटातून नव्हे, तर वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. दिग्दर्शक अभिजीत देशपांडे त्यांच्या जीवनावर आधारित ‘कांबळी’ नावाची एक हिंदी सीरिज काढणार आहे. ही सीरिज एका डिजिटल प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होईल. या मालिकेची निर्मिती ‘200 नॉट आऊट प्रोडक्शन्स’चे रवी भागचंदका करत आहेत. अभिजीत देशपांडे यांनी स्पष्ट केले की, त्यांनी 2019 मध्ये कांबळी यांच्या जीवनावर सर्च आणि कथालेखन सुरू केले. सुरुवातीला यावर एक मराठी चित्रपट बनवण्याची योजना होती, परंतु सर्च दरम्यान त्यांच्या लक्षात आले की कांबळी यांची जीवनकथा इतकी व्यापक आहे की ती एकाच चित्रपटात मांडणे कठीण होईल. त्यामुळे, यावर आधारित वेब सीरिज बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या मालिकेत विनोद कांबळी यांची क्रिकेट कारकीर्द तसेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि संघर्ष दाखवण्यात येईल. त्यांची विलक्षण प्रतिभा, क्रिकेटमधील त्यांचे प्रचंड यश आणि संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनुभवलेल्या अडचणी या कथेचा भाग असतील. दिग्दर्शक म्हणतात की, “ही कथा केवळ क्रिकेट किंवा वादांवर आधारित म्हणून सादर केली जाणार नाही. प्रेक्षकांना कांबळी केवळ एक क्रिकेटपटू म्हणूनच नव्हे, तर एक माणूस म्हणूनही समजावा, हा प्रयत्न असेल.”

कांबळीची भूमिका कोण साकारणार?

निर्माते एका नवीन अभिनेत्याच्या शोधात आहेत, जो केवळ दिसण्यापुरताच नव्हे, तर कांबळीच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि शैलीशीही जुळेल. टीम मोठ्या स्टारपेक्षा भूमिकेसाठी योग्य अभिनेत्याला प्राधान्य देत आहे. या सीरिजमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मैत्री कशी होती हेही दाखवण्यात येणार आहे,.

चित्रीकरण कधी सुरू होऊ शकते?

सीरिजच्या चित्रीकरणाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. निर्माते नोव्हेंबर 2026 मध्ये चित्रीकरण सुरू करण्याची तयारी करत आहेत. योजनेनुसार, चित्रीकरण एकाच शेड्यूलमध्ये पूर्ण केले जाईल आणि त्याला अंदाजे तीन ते चार महिने लागू शकतात. सीरिज पूर्ण झाल्यावर, अभिजीत देशपांडे व्ही. शांताराम यांच्या बायोपिकवर काम पुन्हा सुरू करतील.

Follow Us
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!