AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BaBa Ramdev : बाबा रामदेवांचे हे सोपे घरगुती उपाय करा, किडनीचे सर्व आजार दूर पळवा

BaBa Ramdev : किडनीशी संबंधित समस्या सध्या सामान्य बाब झाली आहे. अशावेळी बाबा रामदेव यांनी काही घरगुती उपाय सांगितलेत. ते अवलंबून तुम्ही किडनी प्रॉब्लेमपासून स्वत:ची सुटका करुन घेऊ शकता. अनेक आजारांवर मात करु शकता. त्या बद्दल जाणून घ्या.

BaBa Ramdev : बाबा रामदेवांचे हे सोपे घरगुती उपाय करा, किडनीचे सर्व आजार दूर पळवा
baba ramdevImage Credit source: Getty Images
| Updated on: Feb 12, 2026 | 1:58 PM
Share

किडनीमध्ये स्टोन, सूज आणि डॅमेज होण्याची समस्या सध्या कॉमन झाली आहे. पाणी न पिणं, अनहेल्दी खाणं पिणं आणि आर्यनचं प्रमाण जास्त असणं ही किडनी विकाराची कारणं असू शकतात. वेळीच किडनीच्या या विकारांवर उपाय केले नाहीत, तर हे गंभीर आजारामध्ये बदलू शकतं. मार्केटमध्ये किडनीच्या त्रासापासून दिलासा मिळवण्यासाठी अनेक उपचार आणि औषधं आहेत. पण तुम्ही किडनी समस्या आयुर्वेदाद्वारे सुद्धा ठीक करु शकता. आयुर्वेदाची ही पद्धत फायद्याची ठरु शकते. त्याशिवाय कुठला साइड इफेक्टही होत नाही.

आयुर्वेदाचे एक्सपर्ट आणि योग गुरु बाबा रामदेव अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांवर उपाय सांगत असतात. यावेळी योग गुरु बाबा रामदेव यांनी किडनीच्या रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी एक उपयुक्त ज्यूस सांगितला आहे. त्यामुळे किडनी तंदुरुस्त राहिलं, आजारही दूर होईल. या आर्टिकलमधून जाणून घेऊया बाबा रामदेव यांचा घरगुती उपाय.

रोजच्या जेवणात कुठला घटक हवा?

बाबा रामदेव यांनी किडनी स्टोनपासून ते किडनीला येणारी सूज अशा वेगवेगळ्या विकारांसाठी घरगुती उपचार सांगितले आहेत. कुठल्याही साइड इफेक्टशिवाय त्याचा परिणाम दिसतो असा त्यांचा दावा आहे. यात कडूलिंब, पिंपळाच्या पाण्याचा रस, कासनी, गोखरू, कोथिंबीर आणि पुदीना यांच्या औषधी मिश्रणाचा उपाय आहे. बाबा रामदेव यांच्यानुसार जे लोक रोजच्या जेवणात कोथिंबीर खातात त्याची किडनी नेहमी स्वस्थ असते. कोथिंबीरमधील एंटीऑक्सीडेंट, विटामिन ए, सी, के आणि मिनरल्स किडनी हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात. त्यामुळे किडनी व्यवस्थित रित्या आपलं काम करु शकते.

स्टोन टाळण्यासाठी काय करालं?

किडनी स्टोनच्या त्रासापासून सुटका हवी असेल, तर रोज कुळीथची डाळ ज्याला हॉर्स ग्राम म्हणतात त्याचं सेवन करा. जर तुम्ही आठवड्यातून एकदा कुळीथ डाळीचं सेवन करत असाल, तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला स्टोन होत नाही.

चपातीमुळे काय होतं?

किडनी फंक्शन एक्टिव ठेवण्यासाठी गव्हाची चपाती फायद्याची असते. बाबा रामदेव यांच्यानुसार,आठवड्यातून तुम्ही एक किंवा दोनवेळा गव्हाची चपाती खात असाल, तर तुमची किडनी हेल्दी राहिलं. किडनीचे आजार होण्याचा धोका सुद्धा कमी होतो.

कार्ल्याचा ज्यूस आठवड्यातून एकदा का प्यावा?

बाबा रामदेव लोकांना कार्ल्याचा ज्यूस पिण्याचा सुद्धा सल्ला देतात. कार्ल्याच्या ज्यूसमुळे पोटाची सफाई एकदम व्यवस्थित होते. त्याशिवाय कार्ल्याचा ज्यूस डायबिटीज रुग्णांसाठी फायद्याचा असतो. कार्ल्याचा ज्यूस पिणं कठीण जात असेल तर त्यात टोमॅटो सुद्धा मिसळू शकता. रामदेव यांच्यानुसार, एखादा व्यक्ती आठवड्यातून एकदा जरी कार्ल्याचा ज्यूस पित असेल, तर त्याचा डायबिटीजचा धोका कमी होतो.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे