AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan: शाहरुखला गप्प बसायला सांगितलं.., अनंत अंबानींसोबतच्या व्हिडीओवरून वाद, किंग खानने थेट इन्फ्लुएन्सरला पाठवली नोटीस

Shah Rukh Khan: शाहरुख खान आणि अनंत अंबानी यांच्यातील एका संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून शाहरुखला गप्प बसण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आला. यावर आता शाहरुख खानने आक्रमक भूमिका घेत कंटेंट क्रिएटर सुविज्ञ शर्मा याला मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Shah Rukh Khan: शाहरुखला गप्प बसायला सांगितलं.., अनंत अंबानींसोबतच्या व्हिडीओवरून वाद, किंग खानने थेट इन्फ्लुएन्सरला पाठवली नोटीस
शाहरुख खान, अनंत अंबानीImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 26, 2026 | 10:59 AM
Share

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. उद्योगपती अनंत अंबानी आणि अध्यात्मिक गुरू सदगुरू यांच्यासोबतच्या एका भेटीदरम्यान शाहरुखला गप्प बसण्यास सांगितल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. या व्हिडीओमुळे मोठी चर्चा सुरू झाली. अखेर या प्रकरणी शाहरुख खानने थेट कायदेशीर पाऊल उचललं आहे. त्याच्या लीगल टीमने कंटेंट क्रिएटर सुविज्ञ शर्माला मानहानीची नोटीस पाठवली आहे.

नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या रीलमध्ये अनंत अंबानी आणि सद्गुरू यांच्यातील संवादाचे काही दृश्य दाखवण्यात आले आहेत. यासोबतच शाहरुख खान आणि अनंत अंबानी यांच्या संभाषणाची एक वेगळी क्लिपही जोडण्यात आली होती. ही रील सुविज्ञ शर्मा याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केली होती. या व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये शाहरुख खानला संभाषणादरम्यान शांत राहण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्यावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.

शाहरुखच्या लीगल टीमचा आक्षेप

या प्रकरणावर शाहरुख खानच्या कायदेशीर टीमने आक्षेप घेतला आहे. 23 नोव्हेंबर रोजी पाठवण्यात आलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये संबंधित रीलमधील मजकूर ‘खोडसाळ, दिशाभूल करणारा आणि मानहानीकारक’ असल्याचं म्हटलं आहे. व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमुळे संभाषणाचा मूळ संदर्भ बदलला जात असून त्यामुळे अभिनेत्याची प्रतिमा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या नोटीसमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 356 चा उल्लेख करण्यात आला आहे. हे कलम मानहानीशी संबंधित आहे.

48 तासांत पाच मागण्या पूर्ण करण्याचे निर्देश

शाहरुखच्या कायदेशीर टीमने सुविज्ञ शर्माला 48 तासांच्या आत पाच मागण्या पूर्ण करण्यास सांगितलं आहे. यामध्ये संबंधित इन्स्टाग्राम रील तातडीनं हटवणं, हा दावा पुन्हा प्रसारित न करणं, व्हिडीओशी संबंधित दिशाभूल करणारे कॅप्शन आणि मजकूर हटवणं किंवा दुरुस्त करणं यांचा समावेश आहे. याशिवाय मूळ व्हिडीओ फुटेज आणि पोस्टशी संबंधित सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच या सर्व सूचनांचं पालन केल्याची लेखी माहिती देण्यासही सांगण्यात आलं आहे.

इन्फ्लुएन्सरनेही दिलं प्रत्युत्तर

कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर सुविज्ञ शर्मानेही दुसऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. शाहरुख खानने या व्हिडीओवर आक्षेप का घेतला, असा सवाल त्याने उपस्थित केला. तसंच आपण केलेला दावा हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेत येणारी टीका असल्याचं त्याने म्हटलं. त्यामुळे आता या व्हायरल रीलचा वाद सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

Follow Us
ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राज
Shivsena : ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; जरांगेंचा खुलासा
Manoj Jarange : 500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; मनोज जरांगे पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले...
पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Supriya Sule : पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
Donald Trump : भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
Rohit Pawar : शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा
Abhijeet Dipke : गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा सवाल
पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती स्पष्ट करा; हायकोर्टाचे आदेश
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!