AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या आरोग्याचे सायलेंट किलर्स कोण? बाबा रामदेव यांनी यादीच सांगितली, आजच करा रामराम

योगगुरू बाबा रामदेव यांनी निरोगी आयुष्यासाठी साखर, मैदा, पांढरा तांदूळ आणि रिफाइंड तेल यांसारख्या ४ 'पांढऱ्या' पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. रासायनिक उत्पादनांऐवजी नैसर्गिक पर्यायांचा वापर करून गंभीर आजार कसे टाळावेत, याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात वाचा.

तुमच्या आरोग्याचे सायलेंट किलर्स कोण? बाबा रामदेव यांनी यादीच सांगितली, आजच करा रामराम
Baba Ramdev
| Updated on: Feb 12, 2026 | 1:52 PM
Share

जुन्या काळी लोक १०० वर्षे निरोगी आयुष्य जगायची, कारण त्यांचा निसर्गाशी आणि आयुर्वेदाशी जवळचा संबंध होता. मात्र, आजची आधुनिक जीवनशैली आपल्याला अकाली वृद्धत्वाकडे आणि आजारांकडे ढकलत आहे, असे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे. पतंजली वेलनेसच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांनी स्वयंपाकघरातील अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे तुमचे शरीर आतून पोखरत आहे.

हल्ली धावपळीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल तरुण वयातच गंभीर आजार जडत आहेत. अशा परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांनी निरोगी राहण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

पांढरे पदार्थ टाळा

बाबा रामदेव यांच्या मते, आपल्या ताटात दिसणारे पांढरे पदार्थ हे आरोग्यासाठी सर्वात मोठे शत्रू आहेत. त्यामुळे प्रामुख्याने खालील चार गोष्टींचा त्याग करावा.

  • साखर: ही केवळ मधुमेहाला निमंत्रण देत नाही, तर शरीरातील जळजळ वाढवते आणि त्वचेच्या समस्यांना कारणीभूत ठरते.
  • मैदा: पांढरे पीठ किंवा मैदा आतड्यांना चिटकून बसतो, ज्यामुळे पचनशक्ती मंदावते आणि बद्धकोष्ठतेसारखे आजार उद्भवतात.
  • पांढरा तांदूळ: अतिप्रमाणात पॉलिश केलेल्या तांदळाचा वापर टाळून त्याऐवजी ब्राऊन राईस वापरावा.
  • रिफाईंड तेल: याला त्यांनी बनावट तेल असे संबोधले आहे. हे तेल शुद्ध करण्यासाठी वापरली जाणारी रसायने हृदयाच्या आरोग्यासाठी घातक आहेत.

शॅम्पूपासून टूथपेस्टपर्यंत सर्वत्र रसायनांचा वापर

आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढी सौंदर्यप्रसाधने किंवा स्वच्छतेची उत्पादने वापरतो. त्यात मोठ्या प्रमाणात रसायने असतात. फेस वॉश, शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणामधील केमिकल्स त्वचेद्वारे शोषली जातात. हळूहळू यकृत (Liver) व मूत्रपिंडाच्या (Kidney) कार्यावर परिणाम करतात, असे बाबा रामदेव यांनी म्हटले. या रसायनांमुळे शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती नष्ट होते. कर्करोगाचा धोका वाढतो.

नैसर्गिक पर्याय काय?

रिफाइंड तेलाऐवजी मोहरी, तीळ किंवा नारळाच्या कोल्ड प्रेस ऑईलचा वापर करावा. तसेच, रासायनिक सौंदर्यप्रसाधनांऐवजी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पर्यायांचा अवलंब केल्यास शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होऊन आर्थिक नुकसानही टाळता येईल. तसेच साखरेऐवजी सेंद्रिय गूळ वापरावा. तसेच रासायनिक क्लिनर्सऐवजी लिंबू, कडुनिंब आणि गोमूत्र अर्कासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून घर आणि शरीर स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा.

प्रतिबंध हाच उपचार

आजकाल लोक आजारी पडल्यावर हजारो रुपये डॉक्टरांकडे आणि औषधांवर खर्च करतात. यामुळे आर्थिक भार तर वाढतोच, पण शरीरही औषधांच्या दुष्परिणामांमुळे थकते. जर आपण आपल्या जीवनशैलीतून काही अतिरिक्त गोष्टी काढून टाकल्या, तर आपल्याला डॉक्टरांची गरजच भासणार नाही,” असे बाबा रामदेव यांनी ठामपणे सांगितले.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे