Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता नाशिक जिल्ह्यालाही बसू लागला आहे. सततच्या पावसामुळे मुंबई–नाशिक महामार्गालगतचा सर्व्हिस रोड पाण्याखाली गेला असून, नाशिकमधील के. पी. कॉलेज परिसरालाही पाण्याचा वेढा पडला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) 7 जुलैसाठी नाशिक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि नाशिक ग्रामीण या भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन या पाच तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या भागांतील आठवडे बाजारही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना अत्यावश्यक गरज नसल्यास शेतात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य पूरस्थिती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर देवस्थान तसेच सप्तशृंगी मंदिर उद्या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाशिकमधील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. पाण्याचा निचरा सुरळीत राहावा यासाठी प्रशासनाने जेसीबी, पोकलेन आणि इतर यंत्रसामग्री सज्ज ठेवली असून, गरज भासल्यास लष्कराची मदतही तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
Published on: Jul 06, 2026 04:24 PM
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून...
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर इस्कॉन...
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत...