AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Accident : वृद्ध बहिणीची भेट घेतली, हॉटेलमध्ये जेवण केले,घरी परतताना मायलेकीवर काळाचा घाला

हॉटेलमधून निघाल्यानंतर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर माढा तालुक्यातील टेभुर्णी बाह्यवळण रस्त्यावर उभ्या असतानाच रात्री साडे दहाच्या सुमारास ट्रकने त्यांना चिरडले. या अपघातात एका मोटार सायकलसह चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Solapur Accident : वृद्ध बहिणीची भेट घेतली, हॉटेलमध्ये जेवण केले,घरी परतताना मायलेकीवर काळाचा घाला
सोलापूरमध्ये अपघातात मायलेकींचा मृत्यूImage Credit source: TV 9
| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 4:07 PM
Share

सोलापूर : मुंबईतील वृध्द बहिणीला भेटून गावाकडे परतत असताना मायलेकीवर काळाने घातला. हॉटेलमध्ये जेवण करुन बाहेर थांबल्या असताना दोघींना ट्रक (Truck)ने चिरडल्याची दुर्दैवी घटना सोलापूरमध्ये घडली आहे. या अपघाता (Accident)त दोघी जागीच ठार झाल्या. शांताबाई विठ्ठल चवरे, जयश्री चंद्रकात वरपे अशी अपघातात ठार झालेल्या अपघातात ठार झालेल्या मायलेकींची नावे आहेत. या दोघीही कोंडी गावातील रहिवासी आहेत. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mother and Daughter died on the spot in a truck accident in Solapur)

अपघातात मायलेकी जागीच ठार

शांताबाई चवरे आणि जयश्री वरपे या दोघी मायलेकी मुंबईत बहिणीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेथून त्या 23 मार्च रोजी रात्री सोलापूरमध्ये परतल्या. सोलापूरमध्ये उतरल्यानंतर त्या दोघींनी हॉटेलमध्ये जेवण केले. जेवून झाल्यानंतर घरी परतत होत्या. हॉटेलमधून निघाल्यानंतर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर माढा तालुक्यातील टेभुर्णी बाह्यवळण रस्त्यावर उभ्या असतानाच रात्री साडे दहाच्या सुमारास ट्रकने त्यांना चिरडले. या अपघातात एका मोटार सायकलसह चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अपघात कसा घडला हे अद्याप कळू शकले नाही. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून संदीपान नवनाथ जगताप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नंदुरबारमध्ये कंटेनर आणि चारचाकीच्या अपघातात तीन ठार

नंदुरबार निझर रस्त्यावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास कंटनेर आणि आर्टिगा गाडी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले. हॉटेल हायवेजवळ हा अपघात घडला. अपघातात हिरालाल पवार, अनिल सोलंकी आणि प्रशांत सोनवणे हे तिघे मयत झाले असून यातील प्रशांत सोनवणे हे रेल्वे सुरक्षा दलात जवान म्हणून कार्यरत होते. आर्टिगा गाडी कंटेनरला मागून धडकल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. (Mother and Daughter died on the spot in a truck accident in Solapur)

इतर बातम्या

धक्कादायक | शाळेला घेऊन जाणाऱ्या वाहनाचा रेडिएटर फुटला, Beed मध्ये दोन विद्यार्थी भाजले

Couple Suicide | आठवीपासून रिलेशनशीपमध्ये, एका भांडणाने सारं उद्ध्वस्त, गर्लफ्रेण्डच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही स्वतःला संपवलं

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.