AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Couple Suicide | आठवीपासून रिलेशनशीपमध्ये, एका भांडणाने सारं उद्ध्वस्त, गर्लफ्रेण्डच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही स्वतःला संपवलं

चार वर्षांपूर्वी विवेक इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी जयपूरला गेला. अंजली सीएची तयारी करत होती. दोघांमध्ये गप्पा व्हायच्या, मात्र दुराव्यानंतर दोघांमध्ये भांडणंही वाढू लागली.

Couple Suicide | आठवीपासून रिलेशनशीपमध्ये, एका भांडणाने सारं उद्ध्वस्त, गर्लफ्रेण्डच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही स्वतःला संपवलं
बिहारमध्ये प्रेयसीनंतर प्रियकराची आत्महत्याImage Credit source: सोशल
| Updated on: Mar 25, 2022 | 2:49 PM
Share

पाटणा : बालपणापासून मैत्री आणि नंतर नातेसंबंधात अडकलेल्या प्रेमी युगुलाचा दुःखद अंत (Couple Suicide) झाला. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादानंतर प्रियकराने (Boyfriend) आपला मोबाईल फोन स्वीच ऑफ केला. त्यामुळे व्यथित झालेल्या प्रेयसीने आत्महत्या केली. बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये (Bihar) गळफास घेऊन गुरुवारी तिने आपल्या आयुष्याची अखेर केली. तर प्रेयसीच्या आत्महत्येचं वृत्त ऐकून प्रियकरालाही मोठा धक्का बसला. त्यामुळे राजस्थानातील जयपूरमध्ये त्यानेही स्वतःच्या जीवाचं बरं-वाईट करुन घेतलं. गगनचुंबी इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी घेत प्रियकराने जीव दिल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

मूळ मुजफ्फरपूरच्या अंजली आणि विवेक यांची ही दुःखद कहाणी आहे. मुजफ्फरपूर जिल्ह्यातील काजी मोहम्मदपूरमध्ये राहणारी 23 वर्षीय अंजली जयस्वाल आणि नीम चौक शंकरपुरी येथे राहणारा 26 वर्षीय विवेक कुमार यांचं ओरिएंट क्लबमधील एका शाळेत शिक्षण झालं. इयत्ता आठवीपासून दोघांचं अफेअर सुरु होतं.

दुराव्यानंतर भांडणं

चार वर्षांपूर्वी विवेक इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी जयपूरला गेला. अंजली सीएची तयारी करत होती. दोघांमध्ये गप्पा व्हायच्या, मात्र दुराव्यानंतर दोघांमध्ये भांडणंही वाढू लागली. त्यामुळे त्यांच्यात ताणतणाव वाढले होते.

फोन कट करुन स्वीच ऑफ

घटनेच्या दिवशी, म्हणजेच बुधवारी रात्री दोघांची एक मैत्रीण त्यांच्या नात्यातील ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न करत होती. तिघं कॉन्फरन्स कॉलवर बोलत असताना त्यांच्यात पुन्हा भांडणं झाली. विवेकने कॉल कट केला आणि फोन स्वीच ऑफ केला.

आधी प्रेयसीची आत्महत्या, मग प्रियकराचीही

अंजली सारखा त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तो बंद येत होता. दुसऱ्या दिवशी विवेकने फोन सुरु केला, तेव्हा अंजलीने आत्महत्या केल्याची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर दुपारी विवेकनेही बिल्डिंगमधून उडी मारुन जीव दिला. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

लायब्ररी सांगून OYO Hotel मध्ये गेली, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, आई-वडिलांना तीन पानी चिठ्ठी

Nanded | महिला डॉक्टरची लॉजमध्ये आत्महत्या, नांदेडमध्ये खळबळ

बुलढाण्यात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या, गोशिंग शिवारातील घटना

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.