कपालेश्वर महादेव पिंडीची झीज, पिंडीला वज्रलेप करण्याचा निर्णय

| Updated on: Jan 29, 2021 | 12:53 PM

शिवपिंडीची झीज रोखण्यासाठी या पिंडीला वज्रलेप करण्याचा निर्णय कपालेश्वर संवर्धन समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.

कपालेश्वर महादेव पिंडीची झीज, पिंडीला वज्रलेप करण्याचा निर्णय
पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदीर
Follow us on

नाशिक : नाशिकच्या अतिप्राचिन असलेल्या पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिराच्या (Vajralep On Mahadev Pindi ) शिवपिंडीची झीज रोखण्यासाठी या पिंडीला वज्रलेप करण्याचा निर्णय कपालेश्वर संवर्धन समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. या निर्णयाने भाविकांमधे समाधान असलं, तरी पुरातत्व विभागाने नाशिकच्या सुंदरनारायण मंदिराबाबत केलेली दिरंगाइ वज्रलेपाबाबत करु नये अशी भाविकांची अपेक्षा आहे (Vajralep On Mahadev Pindi ).

लाखों भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं महादेवाचं पंचवटीतील मंदीर म्हणजे कपालेश्वर महादेव मंदीर. देशातील हे एकमेव असे महादेवाचं मंदीर आहे ज्याठिकाणी महादेवांच्या समोर नंदी नाही. भगवान शंकरांनी नंदीला आपल्या गुरुस्थानी मान दिल्याने याठिकाणी महादेवांसमोर नंदी नाही.

कपालेश्वर महादेव मंदीर

अतिप्राचिन असलेल्या या मंदिराच्या शिवपिंडीवर दैनंदिन दुग्धाभिषेक होत असल्याने शिवपिंडीची मोठ्याप्रमाणावर झीज झाली आहे. ही झीज रोखण्यासाठी कपालेश्वर शिवलिंग संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमधे विश्वस्त, पुजारी आणि भाविक प्रतिनिधी असणार आहेत.

कपालेश्वर महादेव मंदीर

या शिवपिंडीच्या वज्रलेपाबाबत अनेक विद्वान पंडितांशी विचारविनिमय करण्यात आली. आयोध्येतील रामजन्मभूमीच्या वैदिक कामात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या काशीचे गणेश्वर द्राविड शास्त्री यांच्या मार्गदर्शनाने शिवपिंडीवर वज्रलेप केला जाणार असून याबाबत लवकरच पुरातत्व विभागासोबत सविस्तर नियोजन केलं जाणार आहे (Vajralep On Mahadev Pindi).

लाखों भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कपालेश्वर मंदिरात शिवपिंडीवर वर्षानुवर्षे अभिषेक केला जातो. दुग्धाभिषेकासोबतच फळांचे रस, मध, दही, साखर, तूप यांचा देखील वापर अभिषेकासाठी केला जातो. यामुळे अनेक वर्षांपासुन शिवपिंडीची झीज होत असून ही झीज रोखण्यासाठी शेकडो वर्षात पहिल्यांदाच पिंडीवर वज्रलेप प्रयोग केला जाणार असल्यानं भाविकांमधे समाधानाचं वातावरण आहे

कपालेश्वर महादेव मंदीर

Vajralep On Mahadev Pindi

संबंधित बातम्या :

अखेर 10 महिन्यानंतर विठुरायाची पंढरी वारकऱ्यांनी गजबजली

Special Story | ऐतिहासिक सोमनाथ मंदिर, 17 वेळा नष्ट होऊनही भारताचं वैभव