Amravati | अमरावतीत पाणी टंचाईमुळे वार्डातील महिलांचा थेट गाव सोडण्याचा निर्णय

| Updated on: Feb 03, 2022 | 1:06 PM

अमरावती(Amravati)च्या सावंगी मग्रापूर गावातील अनेक ग्रामस्थांनी गाव सोडलंय. सावंगी मग्रापूरच्या वार्ड नंबर एकमधील लोकांनी पाण्या(Water)साठी रात्री गाव सोडलं. तबल 28 दिवसांपासून वार्ड नंबर एकमध्येच ग्रामपंचायती(GramPanchayat)नं पाणीपुरवठा न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Follow us on

अमरावती(Amravati)च्या सावंगी मग्रापूर गावातील अनेक ग्रामस्थांनी गाव सोडलंय. सावंगी मग्रापूरच्या वार्ड नंबर एकमधील लोकांनी पाण्या(Water)साठी रात्री गाव सोडलं. तबल 28 दिवसांपासून वार्ड नंबर एकमध्येच ग्रामपंचायती(GramPanchayat)नं पाणीपुरवठा न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक कुटुंबं रात्रीपासून गावाबाहेरील विहिरीजवळ बसले होते. वस्तीतच पाणी येत नसल्याचा आरोप महिलांनी केला. गावात मागील 25 वर्षांपासून पाण्याची भीषण समस्या आहे. ग्रामपंचायत उपसरपंचानं जाणीवपूर्वक पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून अनेक लोक लहान मुलाबाळांसह गावाबाहेर पडले. तर गावाबाहेर रात्री शेकोट्या पेटवून रात्र काढली. याचवेळी घरादाराची जबाबदारी प्रशासनाची असं म्हणत लोकांनी आता गाव सोडलं आहे. पाण्याची समस्या असलेल्या या गावात आता प्रशासनाकडून पाण्याची व्यवस्था केली जाईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.