वाशिमच्या राजा बोकडासाठी 10 लाखांची ऑफर नाकारली, ‘राजा’ 20 लाखात विकला जाणार, मालकाला विश्वास

| Updated on: Jan 09, 2021 | 8:54 AM

हा बोकड वाशिम जिल्ह्यातील तामसी येथील संतोष पैठणकर यांच्या मालकीचा असून या बोकडला पहाण्यासाठी नागरिकांची रोज एकच गर्दी होत असते.

वाशिमच्या राजा बोकडासाठी 10 लाखांची ऑफर नाकारली, राजा 20 लाखात विकला जाणार, मालकाला विश्वास
Follow us on

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील राजा नावाचा बोकड सध्या चर्चेचा विषय बनला आहे (Washim Buck Raja). हा काही साधा बोकड नसून लाख मोलाचा बोकड आहे. या बोकडाची किंमत ऐकून भल्या भल्याची झोप उडाली आहे. या बोकडासाठी तब्बल 9 ते 10 लाख रुपये देण्यासाठी ग्राहक तयार आहेत. मात्र, या बोकडाच्या मालकाने ही ऑफर नाकारली आहे (Washim Buck Raja).

हा बोकड वाशिम जिल्ह्यातील तामसी येथील संतोष पैठणकर यांच्या मालकीचा असून या बोकडला पहाण्यासाठी नागरिकांची रोज एकच गर्दी होत असते.

वाशिम तालुक्यातील तामसी येथील संतोष पैठणकर यांच्या शेळीने दीड वर्षांपूर्वी दोन पिल्लांना जन्म दिला. त्यापैकी राजा नावाच्या बोकडाच्या डोक्यावर जन्मतःच अर्धचंद्राची खूण आहे. त्यामुळे मुस्लिम धर्मामध्ये बकरी ईदला अशा बोकडाच्या कुर्बाणीला फार महत्त्व आहे. त्यामुळे या बोकडाची किंमत नक्कीच वाढणार असल्याने मालकाने या बोकडाची किंमत 20 लाख ठेवली आहे.

संतोष आमच्याशेजारी असून त्याची परिस्थिती हलाखीची आहे. तो बकऱ्याचा व्यवसाय करत असतो. त्याच्याकडे एका बकरीला डोक्यावर अर्धचंद्र असलेल्या बोकड्याचा पिल्लू जन्माला आला. त्यामुळे संतोषच्या नशीबाने बळी देणारा बोकड आला. मात्र, तेच बोकड भाग्य उजळून देणारं असून एखाद्याच्या नशीब कुठे उजळेल याचे उदाहरण संतोष असल्याचे त्याचे शेजारी देशमुख सांगतात (Washim Buck Raja).

पैठणकर यांनी 3 वर्षांपूर्वी एक बकरी खरेदी केली होती. त्यांच्या या बकरीला एक वर्षांपूर्वी एक पिल्लू झालं. या बोकडाच्या डोक्यावर अर्धचंद्र असल्याने त्यांनी या बोकडांची चर्चेतून माहितीवरुन एका ग्राहकाने या बोकडासाठी 9 ते 10 लाख रुपयांची ऑफर दिली आहे. मात्र, संतोष पैठणकर यांनी 20 लाखात विक्री होणार असा विश्वास आहे.

Washim Buck Raja

संबंधित बातम्या :

Bakrid 2020 | बोकडाच्या वाहतुकीवर आणि कुर्बानीसाठी कोणतीही बंदी नाही : नवाब मलिक

मटणाचा भाव चिकनच्या दसपट, खवय्यांची मात्र बोकडालाच पसंती

स्कॉर्पिओच्या किमतीचा ‘सोन्या’, वाशिममधील बोकडाची किंमत…