पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीची जंगी पार्टी, मुलीचा बाप म्हणाला, रक्ताच्या बदल्यात रक्त…

Pune Kalyani Nagar Accident : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्यायरल होत असून यात तो डान्स करत असल्याचे समोर आले आहे. यावर आता मृत मुलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीची जंगी पार्टी, मुलीचा बाप म्हणाला, रक्ताच्या बदल्यात रक्त...
Pune Kalyani Nagar Accident
Image Credit source: Google
| Updated on: May 27, 2026 | 6:58 PM

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण संपूर्ण देशात गाजले होते. मे 2024 मध्ये पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका नामांकित बिल्डरच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्शे कार चालवत एका तरूणाला आणि एका तरुणीला धडक दिली होती. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता या प्रकरणातील आरोपीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्यायरल होत असून यात तो डान्स करत असल्याचे समोर आले आहे. यानंतर आता मृत तरूणीच्या वडिलांनी मोठे विधान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विशाल अग्रवाल यांचा व्हिडिओ व्हायरल

पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विशाल अग्रवाल आणि त्यांची पत्नी एका भव्य पार्टीमध्ये आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहेत. दोघांच्या गळ्यात नोटांच्या माळा असून ते संगीताच्या तालावर जोरदार नाचताना दिसत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे काहीच दिवसांपूर्वी अग्रवाल यांची जामीनावर तुरुंगातून सुटका झालेली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर टीका होत आहे.

मृत मुलीचा बाप म्हणाला, रक्ताच्या बदल्यात रक्त…

अग्रवाल यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोर्शे कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अश्विनीच्या वडिलांनी संताप व्यक्त केला. आता, आरोपींना कायद्याची भीतीच उरलेली नाही. एखाद्याला उच्च न्यायालयाने शिक्षा दिली तरी सर्वोच्च न्यायालयातून त्याची सुटका होते. त्यामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळते. मुस्लिम देशांप्रमाणे ‘रक्ताच्या बदल्यात रक्त’ असे कठोर कायदे भारतात लागू होईपर्यंत काहीही सुधारणा होणार नाही, अशा शब्दात आपल्या भावना सुरेश कोष्टा यांनी व्यक्त केल्या आहेत.

व्हायरल व्हिडिओवर अग्रवाल यांचे स्पष्टीकरण

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या डान्सच्या या व्हिडिओबाबत विशाल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडिओ जेलमधून सुटका झाल्यानंतर जल्लोष करत असल्याचा दावा करणाऱ्या बातम्या विशाल यांनी फेटाळून लावल्या आहेत. विशाल अग्रवाल यांनी म्हटले की, ‘हा व्हिडिओ 2 सप्टेंबर 2023 रोजीचा असून, गोव्यातील एका हॉटेलमध्ये पत्नी शिवानी अग्रवाल यांच्यासोबत त्यांच्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाचा आनंद साजरा करतानाचा आहे.’

Follow Us