Pune MHADA lottery | अजित पवारांच्या हस्ते पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 घरांसाठी सोडत; जाणून सोडतची तारीख

| Updated on: Dec 30, 2021 | 2:10 PM

शहरातील खाजगी व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून 20 टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करून घेण्यास म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले. यामुळे शहरातील नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पांमध्ये देखील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांना घरे मिळू लागली आहेत.

Pune MHADA lottery | अजित पवारांच्या हस्ते पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 घरांसाठी सोडत; जाणून सोडतची तारीख
मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांची सोडत निघणार
Follow us on

पुणे- पुणे म्हाडाच्या तब्बल 4 हजार 222 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. येत्या 7 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही सोडत पार पडणार आहे. म्हाडाच्या या ४ हजारहून अधिक घरांच्या लॉटरीसाठी तब्बल 64 हजार 715 लोकांनी अर्ज केले आहेत. जिल्हा परिषद येथे सोडतीच्या कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली आहे.

कोरोना काळातही म्हाडा सक्रिय
सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्नपूर्ण पूर्ण कारण्याच्या दुष्टीने पुणे म्हाडाने जवळपास दीड वर्षांत हजारो घरांची तीन वेळा सोडत जाहीर करत नवीन विक्रम केला. शहरातील खाजगी व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून 20 टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करून घेण्यास म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले. यामुळे शहरातील नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पांमध्ये देखील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांना घरे मिळू लागली आहेत.

या प्रकारच्या सदनिकांच्या समावेश
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) पुणे अंतर्गत ही 4 हजार 222 सदनिकांची सोडत आहे. ही 8  वी ऑनलाईन सोडत असून, म्हाडाच्या विविध योजनतील 2823  सदनिका व 20 टक्के सर्वसमावेशक योजन अंतर्गत 1399 सदनिका असे एकूण 4 हजार  222 नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला होता. सदर सोडतीमधील 4 हजार 222 सदनिकांसाठी आतापर्यंत 64 हजार 715 इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. ही सोडत यापूर्वी ठरल्या प्रमाणेच 7 जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे.

रस्त्यात गाडी बंद पडल्याचे निमित्त, मदत करणाऱ्यानं जाळ्यातच ओढलं, सुरू झाला अत्याचाराचा सिलसिला!

Chandrakant Patil | नारायण राणे सगळ्यांना पुरुन उरणारे आहेत, मविआकडून सत्तेचा दुरुपयोग

Vastu tips for study room | लहान मुलांची खोली सजवताय? मग या वास्तु टिप्स नक्की लक्षात ठेवा