AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यात गाडी बंद पडल्याचे निमित्त, मदत करणाऱ्यानं जाळ्यातच ओढलं, सुरू झाला अत्याचाराचा सिलसिला!

15 वर्षाच्या मुलीच्या पर्समध्ये आईला गर्भनिरोधक औषधी आणि प्रेग्नन्सी कीट सापडल्याने मुलीवर दोन महिन्यांपासून अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आलाय.

रस्त्यात गाडी बंद पडल्याचे निमित्त, मदत करणाऱ्यानं जाळ्यातच ओढलं, सुरू झाला अत्याचाराचा सिलसिला!
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 2:01 PM
Share

औरंगाबादः शहरात अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन महिन्यांपासून अत्याचार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे मुलीच्या आईच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला. मुलीच्या पर्समध्ये गर्भनिरोधके आणि प्रेग्नन्सी किट सापडल्यानंतर आईने तत्काळ तिला विश्वासात घेत बोलते केले. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. आईच्या तक्रारीनंतर या प्रकरणी अरविंद सदावर्ते या आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

मोबाइल नंबर मिळाला, प्रेमाच्या जाळ्यात ओढले

मुलीसोबत घडणारा प्रकार कसा उघडकीस आला, याची पोलिसांनी माहिती देण्यात आली. 15 वर्षांची ही मुलगी शिवणक्लासचे प्रशिक्षण घेते. दोन महिन्यांपूर्वी रस्त्यात तिची गाडी बंद पडली. तिने अरविंद सदावर्ते याच्याकडे मदत मागितली. प्रयत्न करूनही गाडी दुरुस्त न झाल्याने अरविंदने तिच्याकडून आईचा नंबर मागितला. आईला याबाबत सूचना दिली. त्यानंतर तो सतत तिच्याशी गप्पा मारायचा आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

आईने पर्स तपासली असता…

15 दिवसांपूर्वी मुलीच्या आईने सहज मुलीची पर्स तपासली असता त्यात गर्भनिरोधक गोळ्या व प्रेग्नन्सी किट आढळले. आईने तिची विचारपूस केली असता अरविंदशी प्रेमसंबंध व शारीरीक संबंध असल्याचे सांगितले. प्रेमाचे आणि लग्नाचे अमिष दाखवून तिला अनेकदा घरी नेऊन शारीरीक संबंध प्रस्थापित केल्याचेही तिने सांगितले. तसेच मोबाइलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले, तिला व्हिडिओ क्लिप दाखवून अरविंद तिला रुमवर नेऊन अत्याचार करत असे. कुणाला सांगितल्यास व्हिडिओ क्लिप व्हायरल करेल, अशीही धमकी देत होता.

आरोपीला पोलीस कोठडी

हा सगळ्या प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीचे आई वडील व मित्र मंडळींनी अरविंदच्या घरी जाऊन त्याचा मोबाइल ताब्यात घेतला. त्यात अश्लील क्लिप सापडली. अऱविंदने गयावया करून मुलीसोबत लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तो गावी गेला. परत येतच नव्हता. अखेर वाळूज पोलिस स्टेशनमध्ये आई-वडिलांनी तक्रार केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

इतर बातम्या-

फडणवीस-अजित पवार शपथविधीवर पवारांचा गौप्यस्फोट, आता अजितदादा खाडकन म्हणाले…

Chandrakant Patil | पवारांनी मोदींच्या ऑफरबद्दल सांगितलं, आता चंद्रकांत पाटलांनी पवारांचा इतिहासच काढला, म्हणाले…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.