पुण्यात दिवाळी पहाट होणार, आठवडी बाजारही भरणार पण काय काय काळजी घ्यायची, अजित पवारांनी सांगितलं

| Updated on: Oct 22, 2021 | 2:41 PM

कोरोना प्रमाण कमी झाल्यानं दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी परवानगीची मागणी करण्यात आली, त्यालाही परवानगी देण्यात आल्याचं जाहीर केलंय. याशिवाय ग्रामीण आणि शहरी भागातील आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याचं अजित पवार म्हणाले.

पुण्यात दिवाळी पहाट होणार, आठवडी बाजारही भरणार पण काय काय काळजी घ्यायची, अजित पवारांनी सांगितलं
राज्यातील 125 तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी वितरीत
Follow us on

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दर शुक्रवार प्रमाणं आज पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोरोना लसीकरणासाठी काम करणाऱ्या सर्वा घटकांचं अभिनंदन केलं. कोरोना प्रमाण कमी झाल्यानं दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी परवानगीची मागणी करण्यात आली, त्यालाही परवानगी देण्यात आल्याचं जाहीर केलंय. याशिवाय ग्रामीण आणि शहरी भागातील आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याचं अजित पवार म्हणाले.

लोक प्रतिनिधींच्या मागणीवरुन दिवाळी पहाटला मंजुरी

पुण्यात डॉक्टर्स, दोन्ही महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नानं पुणे लसीकरणात आघाडीवर आहे. राज्याच्या तुलनेत बारा टक्के लसीकरण पुण्यानं केलं. तर देशाच्या तुलनेत दहा टक्के लसीकरण महाराष्ट्रानं केलं आहे. राहिलेलं लसीकरण वेगात कसं करता येईल याची चर्चा करण्यात आली आहे. लोक प्रतिनिधींच्या मागणीवरून दिवाळी पहाटला मंजुरी देण्यात आली आहे. मिशन कवच कुंडल या मार्फत लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. पुणे शहरात सीरमच्या सहकार्यानं तर ग्रामीण भागातही लसीकरण केलंय जातंय.

म्हणून कोरोना नियमांचं पालन आवश्यक

पुण्यात 15 ऑक्टोबरला शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली. पुण्यानं देशात लसीकरणात आघाडी घेतलीय. पुण्यातील लसीकरणात गेल्या पंधरा दिवसात 9 टक्के वाढ झालीय, असं अजित पवार म्हणाले. कोरोना लसीचा पहिल्या लसीचा डोस घेतल्यानंतर 0.19 तर दुसरा डोस घेतल्यानंतर 0.26 संसर्ग होण्याचं प्रमाण दिसून आलं आहे. कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही संसर्ग होण्याचं प्रमाण ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून आलं आहे, त्यामुळं काळजी घेण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना कोरोना प्रतिंबंधक नियम, फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करावं, मास्कचा वापर करावा, असं आवाहन केलंय.

आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील आठवडी बाजार सुरु करण्यास आजचं परवानगी दिली आहे. शहरी भागातील आठवडी बाजार आज सुरु झालेत. उद्यापासून ग्रामीण भागातील आठवडी बाजार सुरु होतील, असं अजित पवार म्हणाले. आज पासून थिएटर्स आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु केली आहेत. दिवाळी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं शंभर टक्के उपस्थिती ठेवायला परवानगी देऊ, असं अजित पवार म्हणाले.

इतर बातम्या:

अजित पवार भर पत्रकार परिषदेत म्हणाले, त्याला काही लाज, लज्जा, शरम आहे की नाही?

पुणे विद्यापीठ चौकातली कोंडी कशी फुटणार? अजित पवारांनी पुलासह मेट्रोचाही प्लॅन सांगितला

Ajit Pawar said permission is given to Diwali Celebration Programme and Weekly Markets Rural and Urban areas