पुणे विद्यापीठ चौकातली कोंडी कशी फुटणार? अजित पवारांनी पुलासह मेट्रोचाही प्लॅन सांगितला

पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाण पूल पाडल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे आधीच्या पुलाच्या कामात अन मेट्रोच्या मार्गिकेमुळे तो पूल पाडण्यात आला, असं अजित पवार म्हणाले.

पुणे विद्यापीठ चौकातली कोंडी कशी फुटणार? अजित पवारांनी पुलासह मेट्रोचाही प्लॅन सांगितला
अजित पवार


पुणे: पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाण पूल पाडल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. आधीच्या पुलाच्या कामात अन मेट्रोच्या मार्गिकेमुळे तो पूल पाडण्यात आला. कोरोनामुळे नव्या पुलाचे काम थांबले आहे. लवकरच ते सुरु होईल, मुख्यमंत्री स्वतः या नव्या पुलाच्या भूमिपूजनाला येणार आहेत, असं अजित पवार म्हणाले. मेट्रोच्या कामासाठी नागपूर पॅटर्नही वापरण्यात येणार आहे, असंही अजित पवार स्पष्ट केलं.

पूल पाडताना सर्वांशी चर्चा केली

मी मुंबईला असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे चौकातील येथील फ्लाय ओव्हर का पाडला यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. फ्लाय ओव्हर पाडत असताना अधिकारी, महापौर, आयुक्त, आमदार आणि खासदार, तज्ज्ञांना यांना विश्वासात घेतलं होतं. टाटाला काम मिळालंय त्यांना विश्वासात घेतलं होतं. ट्राफिकची पोलीस यंत्रणा आहे त्यांच्याशी बोललो, सौरभ राव यांनी इथं कामं केलं त्यांच्याशी बोललो. देशपांडे आणि त्यांची टीम काम करते त्यांच्याशी बोललो. आम्ही सगळ्यांनी विचार केला. वाढती वाहतुकीची कोंडी दूर करण्याचा विचार करत असताना, तिथून मेट्रोचा फ्लायओव्हर तिथून जात असताना पूर्वीच्या फ्लायओव्हरचे कॉलम आणि मेट्रो जात होती तिचे साईडला कॉलम याची तिथं गर्दी होत होती. सगळ्यांनी सूचवलं हे काढून टाकलं तर काही प्रमाणात खर्च वाढेल पण पुढं 50 वर्ष पुणे करांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे हा निर्णय घेतला.

पुणे विद्यापीठासमोरील चौक वाहतूक कोंडीचा चौक

सध्या तिथं सकाळच्या आणि संध्याकाळच्या पीक आवर्सच्या वेळी वाहतूक कोंडी असते. त्यावेळी प्रचंड गर्दी असते. पुणे विद्यापीठ चौक गर्दीचा चौक आहे. त्या चौका नजीक औंधचा मार्ग, बाणेरचा मार्ग, पाषाणचा मार्ग, सेनापती बापट मार्ग, हरे कृष्ण मार्ग आणि रेंज हील मार्ग तिथं येतो. तिथं सर्व प्रकारची वाहन येत असतात. चौकातील वाहतूक वर्दळ प्रति तास 20 हजार आणि 10 हजार असल्यास उड्डाणपूल बांधावा लागतो. वाहतूक सुरळीत व्हाव्या म्हणून उड्डाणपूल 2006 मध्ये बांधला गेला. मात्र, त्यामध्ये काही उणिवा राहिल्या.

पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करणार, पुणेकरांना शब्द देतो

कोरोना काळात वाहतुकीची वर्दळ कमी असल्यानं पूल पाडण्यासाठी गडबड करण्यात आली. टाटा ही जगविख्यात कंपनी आहे त्यांच्याशी चर्चा करुन मेट्रोचा मार्ग प्रस्तावित आहे. त्याचा विचार केला असता खांबांचं जाळं निर्माण होतं होतं. त्यामुळे मुंबई आयआयटी आणि सिस्ट्रा कंपनीचा सल्ला घेतला. त्यामध्ये एकचं खांब असेल मेट्रोच्याच खांबावार उड्डाणपूल आणि मेट्रोच्या त्याच खांबावरुन मेट्रो धावेल, असा प्रकार नागपूर मेट्रोच्या कामात पाहायला मिळतो, असं अजित पवार म्हणाले. उद्धव ठाकरे भूमिपूजनाच्या कामाला येणार आहेत.

काही भागात आपल्याला अंडरपास काढावे लागतील. जिथं रेल्वेच्या खालून जातो त्याला अंडरपास म्हणतात. अभिमान श्री चौकात ग्रेडसेपरेटर, गणेशखिंड चौकात दोन लेनचा ग्रेड सेपरेटर, सिमला ऑफिस चौक, संचित चौकात जाण्यासाठी दोन लेनचा ग्रेड सेपरेटर करणार आहोत. यासंदर्भात प्रेझेंटेशन झालं आहे, तज्ज्ञांशी चर्चा झालीय. मेट्रोच्या कामाचं भूसंपादन झालं आहे. एका पुलावर तोललेला उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात चार दोन एकची पूर्वतयारी झालीय आरखडा पूर्ण झालाय. वाहतूक आरखडे मंजूर कऱण्यात आलंय. मेट्रोच्या खांबाचे काम पूर्ण करण्यात येईल. उड्डाणपुलाचं काम पूर्ण करुन दीर्घकालीन उपायाद्वारे पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यात यश येईल, असं पुणेकरांना सांगायचंय, असं अजित पवार म्हणाले. पर्यायी मार्गांचा वापर करुन गर्दी कशी टाळता येईल, यासाठी प्रयत्न करता येतील,असं अजित पवार म्हणाले. उड्डाणपुलाच्या काही मान्यता अंतिम टप्प्यात आहेत, त्या पूर्ण झाल्यानंतर दिवाळीच्या आसपास किंवा दिवाळी झाल्यानंतर काम सुरु होईल, असं अजित पवार म्हणाले.

 इतर बातम्या:

एक म्हणतो 25 हजार कोटींचा घोटाळा, दुसरा म्हणतो 10 हजार कोटींचा घोटाळा; विरोधकांच्या आरोपांनंतर अजितदादांनी लिस्टच काढली

सोमय्या म्हणाले, जरंडेश्वरचा मालक कोण ते सांगा?; अजित पवारांनी कुंडलीच मांडली

Ajit Pawar told the plan of development of bridge at Savitribai Pule Pune University and work of Pune Metro

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI