AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : भारतानं एक दगडात तीन पक्षी मारले, अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलने काय साध्य झालं?

भारतानं अलिकडच्या काळात दोन महत्त्वाचे व्यापारी करार केले आहेत, ज्यामध्ये मदर ऑफ ऑफ डील आणि अमेरिकेसोबत झालेल्या कराराच समावेश आहे, यामधून भारताच्या हाती नेमकं काय लागलं, त्याचाच हा आढावा

Explainer : भारतानं एक दगडात तीन पक्षी मारले, अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलने काय साध्य झालं?
India America Trade DealImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 04, 2026 | 6:17 PM
Share

आधी युरोपियन संघ आणि त्यानंतर भारतानं अमेरिकेसोबत केलेल्या ट्रेड डीलमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या या दोन मोठ्या करारांचा पाकिस्तानला थेट मोठा फटका बसणार आहे. याचा परिणाम हा पाकिस्तानच्या कॉटन एक्सपोर्टवर होणार आहे. त्यामुळे भारताच्या या दोन महत्त्वाच्या डील होताच पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. भारतानं अलिकडेच दोन महत्त्वाचे व्यापारी करार केले आहेत, ज्यामध्ये युरोपियन युनियन सोबत भारताने मदर ऑफ ऑल डीलवर सही केली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेसोबत देखील मोठा करार केला आहे. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताच्या टॅरिफमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, अमेरिकेने भारतावरील 50 टक्के टॅरिफ कमी करून आता तो 18 टक्क्यांवर आणला आहे.

भारताच्या या ट्रेड डीलमुळे पाकिस्तानमध्ये मोठा भूकंप आला आहे, भारतानं युरोपियन संघासोबत ट्रेड डील केल्यामुळे युरोपमध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तुंवर कोणताही टॅरिफ आकरण्यात येणार नाहीये, शून्य टक्के टॅरिफ आहे. याचाचा अर्थ आता युरोपियन बाजारपेठेत भारतीय वस्तु स्वस्त मिळणार आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेन देखील भारतावरील टॅरिफ आता कमी केल्यामुळे पुन्हा एकदा भारतीय वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेत स्वस्त होणार आहेत. याचा थेट परिणाम हा पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या कापड व्यावसायावर होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या चिंतेत वाढ झाली आहे. बांग्लादेशचा कापड व्यावसाय देखील मोठ्या संकटात सापडला आहे.

रशियाची भारताला मोठी ऑफर 

दरम्यान दुसरीकडे भारतानं अमेरिकेसोबत करार करताच रशियानं देखील भारताला मोठी ऑफर दिली आहे. रशियानं भारताला कच्च्या तेलावर बाजार भावापेक्षा प्रति बॅरल दहा डॉलरपेक्षाही अधिकची सूट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारता आता कच्च्या तेलाची खरेदी कोणाकडून करणार रशिया की व्हेनेझुएला हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बाग्लादेशलाही मोठा धक्का 

दरम्यान या ट्रेड डीलचा बांगादेशलाही मोठा धक्का बसणार आहे. कारण बांग्लादेश हा जगातील नंबर दोनचा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहे. तर भारताचा कापड निर्यातीमध्ये जगात सहावा क्रमांक लागतो. मात्र आता या दोन प्रमुख डीलमुळे जागतिक बाजारपेठेत भाराताचं कापड उत्पादन स्वस्त होणार आहे, तर बांग्लादेश आणि पाकिस्तानमधील कापड हे महाग होणार आहे. त्यामुळे भाराच्या गारमेंट्सची मागणी वाढणार असून, त्याचा परिणाम हा बांग्लादेशवर होणार आहे.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...