AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानला मोठा दणका, 40 टक्के भूभाग हातातून निसटला? संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेमध्ये कबुली

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताला पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तानची खरी परिस्थिती आता जगसमोर आली आहे, बलोच बंडखोरांनी पाकिस्तानला मोठा दणका दिला असून, पाकिस्तान सरकार हतबल झालं आहे.

पाकिस्तानला मोठा दणका, 40 टक्के भूभाग हातातून निसटला? संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेमध्ये कबुली
Khawaja AsifImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 04, 2026 | 5:19 PM
Share

ऑपरेशन सिंदूरनंतर आम्ही भारतासोबत लढण्यास तयार आहोत, आम्ही प्रत्युत्तर देऊ असे मोठ मोठे दावे करणाऱ्या पाकिस्तानची खरी स्थिती अखेर आता जगासमोर आली आहे. बलोच बंडखोरांनी पाकिस्तानच्या सरकारला जेरीस आणलं आहे. बलोच बंडखोरांसमोर पाकिस्तानी सैनिक हतबल झाले आहेत. बलोच बंडखोरांकडून बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या पाकिस्तानी सैनिकांसोबतच्या संघर्षाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत, ज्यामध्ये बलुचिस्तानमधून पाकिस्तानी सैन्य माघार घेताना दिसत आहे. परिस्थिती एवढी बिकट बनली आहे, की आता खुद्द पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी देखील पाकिस्तानचा 40 टक्के भाग आमच्या हातून निसटल्याचं संसदेमध्ये कबूल केलं आहे.

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी काय म्हटलं?

बलोच बंडखोरांनी पाकिस्तानच्या नाकात दम केला आहे, पाकिस्तानचं सरकार हातबल झालं आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेमध्ये माहिती देताना म्हटलं आहे की, बलुचिस्तानमधल्या विशाल भौगोलिक परिस्थितीमुळे तिथे तैनात करण्यात आलेल्या सौनिकांना या बंडाचा बिमोड करण्यात यश मिळत नाहीये, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. बंडखोरांचा आमच्यावर प्रचंड दबाव आहे, बलुच लिबरेशन आर्मी आता केवळ फक्त एक बंडखोरांची टोळी राहिली नसून, त्यांचं एक जबरदस्त नेटवर्क तयार झालं आहे. त्यांच्याकडे वीस लाख रुपयांच्या रायफल्स आहेत, आमच्याकडे नाहीयेत, त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्र आहेत, ते पण आमच्याकडे नाहीयेत, असं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यानं म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, बलुचिस्तानचं क्षेत्रफळ हे फार मोठं आहे, पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी 40 टक्के क्षेत्रफळ हे एकट्या बलुचिस्तामध्ये आहे, मोठं क्षेत्रफळ आणि भौगोलिक प्रतिकूल परिस्थितीमुळे या आघाडीवर आम्हाला अपयश येत असल्याचं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यानं म्हटलं आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याचं हे वक्तव्य पाकिस्तानची हातबलता दाखवत आहे, भौगोलिक परिस्थितीच कारण देऊन पाकिस्तानकडून आपला पराभव लपवला जात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बलोच बंडोखोरांकडून स्वातंत्र्य बुलचिस्तानची मागणी करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर या लढ्यात त्यांना मोठं यश मिळाल्याचं दिसून येत आहे.

Follow Us
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी