AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी

कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी

| Updated on: Aug 12, 2026 | 5:25 PM
Share

मुळ शिवसेना कुणाची, यावरून सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीचा आजचा दिवस संपला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना पक्षप्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिकार आहेत, विधीमंडळात पक्ष कसा विकला जाऊ शकतो, असा सवाल केला.

विधीमंडळात फूट पडली आयोगाने मान्यता दिली… नंतर शिंदेंनी सत्ता बनवली, अशी सत्ता कुठेही बनली नाही, ही लोकशाहीची थट्टा, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले. शिवसेना संघटना कायमच ठाकरेंकडे होती, असा दावा त्यांनी कोर्टात केला. तसेच पक्षफुट आणि विधीमंडळ फूट वेगळी असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आपले पारडे जड असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला असून, निवडणूक आयोगाकडून मिळालेली पोचपावती आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. आता उद्या कपिल सिब्बल यांना अंतिम युक्तिवादाची संधी मिळणार आहे. यावेळी ते आमदारांच्या अपात्रतेवर महत्त्वाचे भाष्य करणार असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर शिंदे गटाला युक्तिवादाची संधी मिळणार असल्याने आगामी सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 12, 2026 05:19 PM

Follow Us