AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये गोगावले करणार ध्वजारोहण, पालकमंत्रिपदाचा प्रश्न लांबणीवर

मोठी बातमी समोर येत आहे, 15 ऑगस्टला नाशिकमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये गोगावले करणार ध्वजारोहण, पालकमंत्रिपदाचा प्रश्न लांबणीवर
Bharat Gogawale, Girish MahajanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 12, 2026 | 8:37 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, 15 ऑगस्टला नाशिकमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. अद्याप या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आणि रायगडमध्ये 15 ऑगस्टला ध्वजारोहणाचा मान नेमका कोणाला मिळणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर ही माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजन हे 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करणार आहेत. तर रायगडमध्ये भरत गोगावले हे ध्वजारोहण करणार आहेत.

पालकमंत्रिपदाचा तिढा 

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही कायम आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेना शिंदे गटाकडून तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री आदिती तटकरे या पालकमंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री भरत गोगावले हे देखील रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी उत्सुक आहेत, त्यामुळे अजूनही रायगडला नवा पालकमंत्री मिळू शकलेला नाहीये. अजूनही रायगडला पालकमंत्र्यांची प्रतिक्षा आहे. त्यामुळे यावेळी 15 ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार? आदिती तटकरे की भरत गोगावले याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर यावेळी ध्वजारोहणाचा मान हा गोगालवे यांना मिळाला आहे.

तर दुसरीकडे नाशिकमध्ये देखील हीच स्थिती आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचे समर्थक देखील त्यांच्या पालकमंत्रिपदासाठी उत्सुक असल्याचं पहायला मिळतंय, तर दुसरीकडे भाजपकडून गिरीश महाजन हे देखील पालकमंत्रिपदासाठी उत्सुक आहेत.

दरम्यान यावेळी मात्र आता रायगडमध्ये 15 ऑगस्टला  भरत गोगावले हे ध्वजारोहण करणार आहेत, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये सध्या रस्सिखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अनेकदा भरत गोगावले यांच्याकडून पालकमंत्रिपदावर दावा देखील करण्यात आला आहे.

Follow Us
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट