AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omraje Nimbalkar: ‘मला उद्या अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायचंय…’ ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्याची तुफान चर्चा, कुणाला उपरोधिक टोला?

Omraje Nimbalkar Statement: धाराशिव लोकसभा निवडणुकीआधीच शिवसेनेत उमेदवारीवरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. त्यातच स्वजिल्ह्यातील नेत्याला ओमराजे निंबाळकर यांनी मिश्किल टोला हाणला आहे. या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.

Omraje Nimbalkar: 'मला उद्या अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायचंय...' ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्याची तुफान चर्चा, कुणाला उपरोधिक टोला?
ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्याची तुफान चर्चा
| Updated on: Nov 24, 2026 | 7:09 AM
Share

श्रीराम क्षीरसागर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : धाराशिव लोकसभा मतदारसंघात २०२९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय दावे प्रति दावे होऊ लागले आहेत. रनिंग खासदार शिवसेनेचे असताना शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण १०० टक्के लोकसभा निवडणूक लढवणार असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानामुळे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना माजी आमदार चौगुले यांनी एक प्रकारे राजकीय आव्हानच दिल्याचे दिसत आहे. त्यावर निंबाळकर यांनी मिश्किल टोला हाणला आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

चौगुले यांना उपरोधिक टोला

दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी या विधानावर अत्यंत विचारपूर्वक प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षातील एकसंगता आणि एकवाक्यता काय आहे, हे तुम्हाला २०२९ ची निवडणूक लागल्यानंतर दिसून येईल, असं म्हणत त्यांनी पक्षातील एकजुटीचा विश्वास व्यक्त केला.मात्र, ज्ञानराज चौगुले यांच्या उमेदवारीच्या इच्छेवर बोलताना ओमराजेंनी मिश्किल टोला लगावला. ‘मला उद्या अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे, मग तुम्ही मला अडवणार का?’ असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.

‘यशाचं श्रेय घेता, मग अपयशाचंही श्रेय घ्या!’

धाराशिव जिल्ह्यात २०२० च्या खरीप पीकविमा भरपाईच्या २२७ कोटी रुपयांच्या प्रश्नावरून आता भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई रंगताना पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीकविमा प्रकरणात शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या विजयाचे श्रेय आपल्या पाठपुराव्याला दिले होते. तर दुसरीकडे शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आज धाराशिवमध्ये पत्रकार परिषद घेऊन २२७ कोटींच्या पीकविमा भरपाईसाठी आपण केलेला पाठपुरावा आणि प्रयत्नांची माहिती दिली.

दरम्यान, यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांना विचारले असता, ज्यांनी पाठपुरावा केला त्यांना श्रेय घेण्यास हरकत नाही, मात्र यशाचे जसे श्रेय घेतले जाते, तसे अपयशाचेही श्रेय घेतले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.एवढेच नाही तर केंद्र सरकारच्या कामांच्या ठिकाणी, रेल्वे आणि नॅशनल हायवेवर जाऊन काहीजण रील काढतात, अशी टिप्पणी करत ओमराजेंनी नाव न घेता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील विजयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी २२७ कोटींच्या पीकविमा भरपाईवरून राजकीय श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. शेतकर्‍यांच्या विजयाचे श्रेय नेमके कुणाचे, यावरून धाराशिवच्या राजकारणात महायुतीमध्ये वाद भेटल्याचे दिसत आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू