कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्याला मोठा दणका, थेट लंडनला जाण्यापासून रोखले, व्हिडीओ करत..
सीजेपी गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधात जोरदार लढा देत आहे. मात्र, सीजेपीच्या आंदोलनामुळे दिल्लीतील सुरक्षा धोक्यात आली. हजारो लोक एकाच वेळी रस्त्यावर उतरले. त्यातच आता सीजेपीला मोठा धक्का सरकारने दिला.

कॉकरोच जनता पार्टीचे नेते साैरभ दास यांनी पुन्हा सरकारवर गंभीर आरोप केला. दिल्ली विमानतळावर लंडनला जाण्यापासून आपल्याला रोखण्यात आल्याचा दावा साैरभ दास याने केला. साैरभ दास याचे म्हणणे आहे की, ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्याला एका भाषणासाठी आमंत्रित करण्यात आले. मात्र, विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला कळवले की, तुमच्या पासपोर्टवर फ्लॅग लावण्यात आला. त्यामुळे तुम्ही हा प्रवास करू शकणार नाहीत. याबाबत दिल्ली पोलिसांना विचारले असताना त्यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे साैरभ दासला सांगितले. जंतर मंतर झालेल्या आंदोलनानंतर साैरभ दासला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत साैरभ दासने लिहिले की, मला भितऱ्या मोदी सरकारने दिल्ली विमानतळावर लंडनला जाण्यापासून रोखले.
मला ऑक्सफोर्ड विद्यापीठात भाषणासाठी जायचे होते. मला विमानतळावरील इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, तुम्ही हा प्रवास करू शकणार नाहीत, कारण तुमच्या पासपोर्टवर फ्लॅग लावण्यात आले. यादरम्यानचा व्हिडीओही साैरभ दास याने सोशल मीडियावर शेअर केला. साैरभ दासने व्हिडीओत म्हटले की, माझी रात्री 1 वाजताची दिल्लीची फ्लाईट होती.
लंडनमधील प्रतिष्ठीत विद्यापीठाने मला भाषणासाठी बोलावले होते. एका विद्यार्थी संघटनेकडून मला आमंत्रण देण्यात आले. मी जसेही विमानतळावर इमिग्रेशनसाठी पोहोचलो तसे मला समजले की, एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यापासून मला रोखण्यात आले. माझ्या पासपोर्टवर फ्लॅग लावण्यात आले. साैरभ दासने दावा केला की, त्याला दिल्ली विमानतळावर रोखण्यात आले.
Instagram पर यह पोस्ट देखें
साैरभ दास याला ऑक्सफोर्ड विद्यापीठात ऑक्सफोर्ड यूनियनने बोलावले होते. सीजेपीने सोशल मीडियावर पोस्ट शेअक करत लिहिले की, भितरी सरकार शिक्षित लोकांच्या आवाजाला इतकी जास्त घाबरते की, लोकांना रोखण्यासाठी आता या स्तरावर पोहोचली आहे. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी याबाबत आम्हाला काही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत अभिजीत दिपके यांनीही संताप व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली.
