वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा; तुमच्या मागे सर्वाेच्च न्यायालय उभा आहे; अमृता फडणवीसांचे वक्तव्य

| Updated on: Jun 11, 2022 | 8:29 PM

गरिबीमुळे जरी तुम्ही या व्यवसायात आल्या असाल तरी देखील गर्वाचं काम करत आहात, अशा शब्दांत त्यांना पाठिंबा वेश्याव्यवसायाला पाठिंबा दर्शविला आहे.

वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा; तुमच्या मागे सर्वाेच्च न्यायालय उभा आहे; अमृता फडणवीसांचे वक्तव्य
Follow us on

पुणे : वेश्याव्यवसायाचा प्रोफेशन (prostitute profession) म्हणून स्वीकार करायला हवा. जर्मनीमध्ये तर त्याकडे आदराने बघितले जाते. मी त्याच्या पाठीमागे आहे, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis wife and singer Amrita Fadnavis) यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून (BJP Mahila Aghadi) पुण्यातील लाल बत्ती भागातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अमृता फडणवीस बोलत होत्या. समाजात वेश्याव्यवसायामुळे संतुलन राखले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

वेश्याव्यवसाय हा पुरातन काळापासून सुरु असून त्याद्वारे समाजाचे संतुलन राखण्याचे काम करताना तुम्हाला गर्व वाटायला पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तुम्ही जे काम करत आहात ते प्रामाणिकपणे करत आहात.

 …तरी देखील गर्वाचं काम

आणि गरिबीमुळे जरी तुम्ही या व्यवसायात आल्या असाल तरी देखील गर्वाचं काम करत आहात, अशा शब्दांत त्यांना पाठिंबा वेश्याव्यवसायाला पाठिंबा दर्शविला आहे.

या व्यवसायाला सर्वोच्च न्यायालयाचाही पाठिंबा

वेश्या व्यवसायाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, तुमच्या या व्यवसायाला सर्वोच्च न्यायालयानेही पाठिंबा दर्शविला आहे. तुमचा बचाव करण्यासाठी आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत.

तुम्ही आम्हाला कधीही हाक मारा

तुम्ही कोणत्याही कारणामुळे या व्यवसायात पडल्या असाला तरीदेखील तुम्ही सगळ्या या समाजाचा अविभाज्य भाग आहात. जर तुमच्यावर काही वाईट प्रसंग आला तर तुम्ही आम्हाला कधीही हाक मारा आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत असा विश्वासही अमृता फडणवीस यांनी महिलांना दिला.

स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्या

या मुलींना काय करायचं आहे हे त्यांच्या लक्षात आणून द्या. त्यांना सुरुवात करून देणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यांच्या शिक्षणाची सोय करणे हे देखील महत्त्वाचं आहे आणि स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणंसुद्धा तेवढंच महत्तवाचं आहे.

अनेक रोगांची बाधा होऊ शकते

या व्यवसायामुळे अनेक रोगांची बाधा होऊ शकते मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका. चांगल्या ट्रेनरची नेमणूक करून तुमच्यासाठी योगा शिबिराचे आयोजन केले जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.