Video : ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिये!, लाहीलाही करणाऱ्या उन्हात माकडांची पाण्याच्या टाकीत अंघोळ!

| Updated on: Apr 30, 2022 | 5:54 PM

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ या गावातील हा व्हीडिओ आहे. या गावात माकडांची संख्या मोठी आहे. माकडांच्या वास्तव्याबाबत या गावात जुनी परंपरा आहे.. सध्या उन्हाचा कडाका असल्यानं सर्वचजण पोहण्याची मजा घेताना दिसतात.

Video : ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिये!, लाहीलाही करणाऱ्या उन्हात माकडांची पाण्याच्या टाकीत अंघोळ!
शिर्सुफळमध्ये माकडांच्या पाण्यात डुबक्या
Follow us on

बारामती : सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढतोय. अश्यात अंगाची लाहीलीही होत आहे. उन्हामुळे अनेकांना त्रास होतोय. प्राण्यांनाही या उन्हाचा त्रास होतोय. अश्यातच एक व्हीडिओ समोर आला आहे. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ या गावातील हा व्हीडिओ आहे. या गावात माकडांची संख्या मोठी आहे. माकडांच्या वास्तव्याबाबत या गावात जुनी परंपरा आहे.. सध्या उन्हाचा कडाका असल्यानं सर्वचजण पोहण्याची मजा घेताना दिसतात.. अशात माकडेही मागे राहिलेली नाहीत.. शिर्सुफळ येथील एका घराबाहेरील टाकीत माकडांनी डुबक्या मारत उन्हाळ्यात पाण्याचा आनंद घेतला.

शिर्सुफळमध्ये माकडांच्या पाण्यात डुबक्या!

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ या गावातील हा व्हीडिओ आहे. या गावात माकडांची संख्या मोठी आहे. माकडांच्या वास्तव्याबाबत या गावात जुनी परंपरा आहे.. सध्या उन्हाचा कडाका असल्यानं सर्वचजण पोहण्याची मजा घेताना दिसतात.. अशात माकडेही मागे राहिलेली नाहीत.. शिर्सुफळ येथील एका घराबाहेरील टाकीत माकडांनी डुबक्या मारत उन्हाळ्यात पाण्याचा आनंद घेतला. त्याचा हा व्हीडिओ…

माकडांचं गाव…

शिर्सुफळ या गावात शिरसाई देवीचं मंदीर आहे. इथे मोठ्या प्रमाणावर माकडांचा वावर आहे. तिथल्या माकडांचा हा व्हीडिओ सध्या पाहायला मिळतोय.

पुण्याचं सध्याचं तापमान

पुण्यात उन्हाचा चटका वाढला आहे. या रणरणत्या उन्हामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात कमाल तापमानात 1.2 अंशांनी वाढ झाली आहे. पुण्यात गुरुवारी 41.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर काल शहरातील तापमानाचा पारा 42 अंशावर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. एप्रिल महिन्यातील ही तापमानातील वाढ उच्चांकीच म्हणावी लागेल. मागील काही दिवसांपासून उकाड्याने पुणेकर हैराण होतेच. मात्र आता उन्हाच्या चटक्याची भर यात पडली असल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. मध्यंतरी पावसाच्या शिडकाव्याने काहीसा दिलासा मिळाला होता. त्यादरम्यान तापमानात घटही झाली होती. तापमान 40 अंशांच्या आतच होते. पुण्यात या महिन्याच्या शेवटपर्यंत अंशतः ढगाळ हवामान कायम राहील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

पुढच्या काही दिवसात मध्य महाराष्ट्रातील काही भागात महिनाअखेरपर्यंत उष्णतेची लाट सदृश परिस्थिती जाणवू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. तर पुण्यात पारा 40 अंश सेल्सिअसच्या आसपास जाऊ शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले होते. त्या अंदाजापेक्षा अधिकची वाढ पुण्यात झालेली पाहायला मिळत आहे. जवळपास 42 अंशांच्या आसपास पारा वाढल्याने पुणेकरांची काळजीही वाढली आहे. आता मेची धास्ती पुणेकरांना लागून राहिली आहे.