भीमा-कोरेगाव आयोगाच्या सुनावणीला आजपासून सुरुवात; साक्षीदारांचा जबाब नोंदवणार

| Updated on: Aug 02, 2021 | 8:18 AM

Bhima Koregaon | आयोगातील दोन सदस्यांसमोर सुनावणीची संपूर्ण प्रक्रिया पार पडेल. कोलकाता उच्च न्यायालायचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जयनारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली भीमा कोरेगाव आयोग स्थापन करण्यात आला होता.

भीमा-कोरेगाव आयोगाच्या सुनावणीला आजपासून सुरुवात; साक्षीदारांचा जबाब नोंदवणार
भीमा कोरेगाव
Follow us on

पुणे: भीमा-कोरेगावमध्ये 2018 उसळलेल्या दंगलप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाच्या सुनावणीला सोमवारपासून सुरुवात होत आहे. 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीत ही सुनावणी चालणार आहे. पुण्यात ऑनलाईन पद्धतीने ही सुनावणी पार पडेल.
यावेळी भीमा-कोरेगाव दंगलीतील साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत.

आयोगातील दोन सदस्यांसमोर सुनावणीची संपूर्ण प्रक्रिया पार पडेल. कोलकाता उच्च न्यायालायचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जयनारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली भीमा कोरेगाव आयोग स्थापन करण्यात आला होता. सोमवारी रेखाताई साहेबराव शिवले आणि प्रल्हाद ईश्वर गायकवाड या दोन साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात येईल. कोरोनामुळे आयोगाचं कामकाज बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आजपासून सुनावणीला सुरुवात होईल.

भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवारांना साक्षीसाठी बोलावणार

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. शरद पवारांनी अनेकदा माध्यमांसमोर भीमा कारेगाव प्रकरणात आपल्याकडे महत्त्वाची माहिती असल्याचं सांगितलं होतं. तसेच अनेक गंभीर आरोपही केले होते. त्यामुळे आता चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी या माहितीचा तपासात समावेश करण्याचा निर्णय घेतला होता.

शरद पवार यांनी सातत्याने भीमा कोरेगाव प्रकरणावर भूमिका घेत पुणे पोलिसांच्या तपासावर आणि निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनाही या प्रकरणात साक्षीसाठी बोलवावं अशी मागणी होत होती. स्वतः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील हीच मागणी केली होती.

संबंधित बातम्या:

Stan Swamy Death: भीमा-कोरेगाव हिंसाप्रकरणात अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामींचं निधन

भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

भीमा कोरेगाव : पोलीस आणि तत्कालीन सरकारकडून सत्तेचा गैरवापर : शरद पवार