Pimpri-Chinchwad corona Update| पिंपरीत पोलीस दलात कोरोनाचा विळखा घट्ट ; मावळ, लोणावळ्यात पर्यटनासाठी जाताय मग ‘या’ नियमांचं करावं लागले पालन

| Updated on: Jan 16, 2022 | 10:45 AM

मावळ व लोणावळा येथील चेक पोस्टवर नागरिकांची तपासणी करत असताना, लसी डोस न घेतलेला व्यक्ती आढळ्यास त्या व्यक्तीला चेक पोस्टवरच लस टोचली जाणार आहे. सर्व चेक पोस्ट वर पर्यटकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले का नाही त्याची पडताळणी करण्यात येणार आहे.

Pimpri-Chinchwad corona Update|  पिंपरीत पोलीस दलात कोरोनाचा विळखा घट्ट ; मावळ, लोणावळ्यात पर्यटनासाठी जाताय मग या नियमांचं करावं लागले पालन
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पिंपरी- पिंपरी चिंचवड मध्ये पोलिसदलात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. शहरात 112 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात काल एका दिवसात 27 पोलिस कर्मचारी कोरोना बाधित झालेत.काही पोलिस स्थानकात तर 14 कर्मचारी कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे.

या पोलीस स्थानकामधील पोलीस बाधित
पोलिस स्थानकानुसार विचार केला तर

भोसरीत 14 ,

भोसरी एमआयडीसी मध्ये 7,

हिंजवडी मध्ये 18,

म्हाळुंगे चौकीत 4,

पिंपरीत 9,

शिरगाव चौकीत 1,

चिखलीत 5,

निगडीत 3,

देहूरोड 2,

सांगवीत 1

चाकणत 5 ,

तळेगाव दाभाडेत 1,

तळेगाव एमआयडीसीत 6,

दिघीत 3

इतर शाखात तब्बल 33 पोलिस कर्मचारी कोरोना बाधित आहेत.

दुसरीकडं जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंध कडक करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या मावळ तालुक्यासह लोणवळ्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असतील तरच प्रवेश मिळणार आहेत. यासाठी नगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून मुंबई आणि पुण्याच्या प्रवेशद्वारावर चेक पोस्ट लावण्यात येणार आहेत. उद्या सोमवार (17 जानेवारी) पासून याची अंमलबजावणी होणार आहे . मावळमधील अन्य गावे कामशेत,तळेगांव दाभाडे, कान्हे रेल्वे गेट परिसरातील प्रवेशद्वारावर अशाच पद्धतीने नाकाबंदी असणार आहे.

चेक पोस्टवरच दिली जाणार लस
मावळ व लोणावळा येथील चेक पोस्टवर नागरिकांची तपासणी करत असताना, लसी डोस न घेतलेला व्यक्ती आढळ्यास त्या व्यक्तीला चेक पोस्टवरच लस टोचली जाणार आहे. सर्व चेक पोस्ट वर पर्यटकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले का नाही त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मावळ आणि लोणावळा परिसरातील कोरोना रुग्ण संख्या वाढून ऍक्टिव्ह रुग्ण संख्या वाढू लागल्याने हा निर्णय मावळ प्रांताधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे.

मावळमधील सद्यस्थिती
सध्या मावळ तालुक्यातील कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संखया 830 पर्यंत पोहचली आहे त्यातील 557 रुग्ण हे तालुक्यातील विविध रुग्णालय उपचार घेत आहेत तर 273 रुग्ण हे गृहवीलगीकरणं आहेत.

Yavatmal | दगडफेक प्रकरण; 215 जणांवर गुन्हा दाखल, 9 जण ताब्यात

Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम, देशात 2 लाख 71 हजार नवे रुग्ण, 314 जणांचा मृत्यू

VIDEO : पॅराग्लायडिंग करताना मुलीला फुटला घाम, इन्स्ट्रक्टरला म्हणाली – ‘मला खाली पाहू देऊ नकोस’