VIDEO : पॅराग्लायडिंग करताना मुलीला फुटला घाम, इन्स्ट्रक्टरला म्हणाली – ‘मला खाली पाहू देऊ नकोस’

VIDEO : पॅराग्लायडिंग करताना मुलीला फुटला घाम, इन्स्ट्रक्टरला म्हणाली - 'मला खाली पाहू देऊ नकोस'
मुलीचं पॅराग्लायडिंग

ज्यांना काहीतरी वेगळं, काही धाडसी काम करावंसं वाटतं. अशा लोकांसाठी पॅराग्लायडिंग (Paragliding), डायव्हिंग आणि बंजी जंपिंगसारखे खेळ सर्वोत्तम आहेत. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्याला या मुलाच्या पॅराग्लायडिंग व्हिडिओचं 'फिमेल व्हर्जन' म्हटलं जातंय.

प्रदीप गरड

|

Jan 16, 2022 | 10:25 AM

जगात असे बरेच लोक असतात, ज्यांना पठडीबाहेर काहीतरी करायचं असतं. सहसा लोक कुठंही फिरायला जातात, मग तिथलं खाणं-पिणं, निसर्गसौंदर्य बघणं, डोंगर-दऱ्या बघणं आणि मग तिथून परतणं. पण त्याचबरोबर काही माणसं अशी असतात, की ज्यांना काहीतरी वेगळं, काही धाडसी काम करावंसं वाटतं. अशा लोकांसाठी पॅराग्लायडिंग (Paragliding), डायव्हिंग आणि बंजी जंपिंगसारखे खेळ सर्वोत्तम आहेत. गेल्या 10-15 वर्षांत या खेळांकडे लोकांची आवड खूप वाढलीय. पूर्वी लोक या सर्व गोष्टी फक्त चित्रपटांमध्ये पाहत असत, विशेषत: पॅराग्लायडिंग… परंतु आज भारतात अनेक ठिकाणं आहेत, जिथं पॅराग्लायडिंग केलं जातं.

पॅराग्लायडिंगचं ‘फिमेल व्हर्जन’

तुम्हाला आठवत असेल, की काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पॅराग्लायडिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक तरूण घाबरून ओरडत होता आणि खाली उतरण्यास सांगत होता. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्याला या मुलाच्या पॅराग्लायडिंग व्हिडिओचं ‘फिमेल व्हर्जन’ म्हटलं जातंय. या व्हिडिओमध्येही भीतीमुळे मुलीची प्रकृती बिघडलीय.

इन्स्ट्रक्टर सांगतो, हा व्हिडिओ होणार व्हायरल

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव. ती इन्स्ट्रक्टरला वारंवार सांगतेय, की मला खूप भीती वाटतेय, मी खाली पाहू शकत नाही, मला खाली पाहू देऊ नका. त्याचवेळी इन्स्ट्रक्टरही मुलीला वारंवार समजावून सांगतो, की तू खाली बघू नकोस, तू फक्त कॅमेरा बघ. यादरम्यान तो गंमतीनं म्हणतो, की तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय, जो सोशल मीडियावर व्हायरल होईल. यानंतर मुलीच्या चेहऱ्यावर एकदा हसू येतं, परंतु तिची भीती मात्र कायम आहे.

ट्विटर हँडलवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ आयएएस अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय. त्याला कॅप्शनही त्यांनी दिलंय, की पॅराग्लायडिंग अप्रतिम आहे, नाही का?’. 47 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1200हून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाइक आणि कमेंटही केल्या आहेत.

Viral : सर्वांनाच भावली लाडू विकण्याची ‘ही’ अनोखी पद्धत; IPS अधिकाऱ्यानं Video शेअर करत म्हटलं…

पाळीव कुत्रा पाहायचा ब्रेस्टकडे, द्यायचा सूचक इशारा, सत्य समोर आल्यानंतर महिला हादरली

यवतमाळच्या सिद्धार्थनं स्नेहलच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि म्हणाला, डार्लिंग…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें