पाळीव कुत्रा पाहायचा ब्रेस्टकडे, द्यायचा सूचक इशारा, सत्य समोर आल्यानंतर महिला हादरली

पाळीव कुत्रा पाहायचा ब्रेस्टकडे, द्यायचा सूचक इशारा, सत्य समोर आल्यानंतर महिला हादरली
CANCER WOMEN (फोटो क्रेडिट मिरर यूके)

इमानदारीच्या बाबतीत कुत्रा या प्राण्याचे (Animal) नाव प्राधान्याने घेतले जाते. सध्या कुत्र्याच्या अशाच इमानदारीचा प्रचीती देणारा प्रसंग देशभरात चर्चेचे कारण ठरतोय. कुत्र्याने आपल्या मालकीनीला गंभीर आजारापासून (Disease) वाचवले आहे. कुत्र्याने केलेल्या या कामगिरीचे संपूर्ण जगातून कौतुक केले जात आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 16, 2022 | 7:50 AM

मुंबई : अनेकांना कुत्रा (Pet Dog), मांजर असे प्राणी पाळायला आवडते. काही लोकांना हे प्राणी त्यांच्या जीवाच्या पलीकडे प्रिय असतात. तर दुसरीकडे काही पाळीव प्राणीदेखील आपल्या मालकाप्रती शेवटच्या श्वासापर्यंत इमानदारी दाखवतात. इमानदारीच्या बाबतीत कुत्रा या प्राण्याचे (Animal) नाव प्राधान्याने घेतले जाते. सध्या अशाच एका कुत्र्याच्या इमानदारीची प्रचीती देणारा प्रसंग जगभरात चर्चेचे कारण ठरतोय. कुत्र्याने आपल्या मालकीनीला गंभीर आजारापासून (Disease) वाचवले  असून त्याच्या कामगिरीचे संपूर्ण जगातून कौतुक केले जात आहे.

कुत्रा सारखा छातीजवळ जात होता 

याबाबतचे वृत्त मिरर यूके या वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. मिरर यूकेने दिलेल्या वृत्तानुसार वेस्ट यॉर्कशायरमध्ये अॅना नेरी (Anna Neary) नावाची 46 वर्षांची महिला राहते. या महिलेने हार्वे नावाचा एक कुत्रा पाळलेला आहे. हा कुत्रा मागील काही दिवसांपासून अॅना नेरी यांच्या छाजीवळ सारखा घुटमळत होता. सुरुवातीला अॅना नेरी यांना कुत्रा असं का करतोय, हे समजले नाही. त्यांनी कुत्र्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र मागील काही आठवड्यांपासून कुत्रा सारखा छातीजवळ येऊ झोपत होता. कुत्रा महिलेच्या ब्रेस्टकडे सारखे पाहत होता. सातत्याने घडणाऱ्या या प्रकारमुळे महिला अचंबित झाली. त्यानंतर महिलेने कुत्र्याच्या हरकतींकडे बारकाईने पाहून स्वतची आरोग्य चाचणी करुन घेतली. या चाचणीत नंतर धक्कादायक असे रिपोर्ट समोर आले.

तपासणी केल्यानंत कॅन्सर असल्याचे झाले निदान 

अॅना नेरी यांनी डॉक्टरांकडे जाऊन स्वत:ची तपासणी केली. या तपासणीत अॅना नेरी यांना कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं. महिलेचा ब्रिस्ट कॅन्सर तिसऱ्या टप्प्यात पोहोचला होता. त्यानंतर या महिलेने तत्काळ उपचार घेणे सुरु केले. कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत. मात्र निदर्शनास आल्यानंतर वेळीच योग्य उपचार घेतले तर कॅन्सरवर मात करता येते. अॅना नेरी यांना कॅन्सर असल्याचे निदर्शनास आणण्यात त्यांच्या कुत्र्याने खूप मदत केली. कुत्र्यामुळे त्यांचा जीव वाचू शकला.

सोशल मीडियावर कुत्र्याची स्तुती 

हा संपूर्ण अनुभव अॅना नेरी यांनी सोशल मीडियावर सांगितला आहे. महिलेच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी कुत्र्याचे भरभरून कौतुक केले आहे. तसेच महिलेच्या या पोस्टला जगभरातील माध्यमांनी महत्त्व देत त्यावर वृत्त प्रसिद्ध केलेले आहे.

इतर बातम्या :

Satyamev Jayate : राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या अशोक स्तंभाच्या खाली लिहिले गेलेले सत्यमेव जयते ‘या’ ग्रंथातून घेण्यात आले, ही आहे त्यामागील कहाणी!

Skin care : त्वचेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर!

corona | कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रामबाण उपाय ‘काढा’,  जाणून घ्या काढा घेण्याचे फायदे 


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें