Viral : सर्वांनाच भावली लाडू विकण्याची ‘ही’ अनोखी पद्धत; IPS अधिकाऱ्यानं Video शेअर करत म्हटलं…

Viral : सर्वांनाच भावली लाडू विकण्याची 'ही' अनोखी पद्धत; IPS अधिकाऱ्यानं Video शेअर करत म्हटलं...
लाडू विक्रेता

एक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर फिरतोय, ज्यामध्ये एक व्यक्ती अगदी अनोख्या पद्धतीनं लाडू विकताना दिसतेय. तो एक गाणं गाऊन लाडू विकतोय. तोच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रदीप गरड

|

Jan 16, 2022 | 7:50 AM

भारतात प्रतिभेची कमतरता नाही. इथं एकापेक्षा एक कलाकार आहेत, जे आपल्या अप्रतिम कलात्मकतेनं लोकांचं लक्ष वेधून घेतात. आज इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या या युगात काहीही अशक्य नाही. प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट इथं व्हायरल (Viral) होत असते. आजकाल असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर फिरतोय, ज्यामध्ये एक व्यक्ती अगदी अनोख्या पद्धतीनं लाडू विकताना दिसतेय. तो एक गाणं गाऊन लाडू विकतोय. तोच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अनोखी स्टाइल

व्हिडिओमध्ये ती व्यक्ती लाडू विकत असल्याचं तुम्ही पाहू शकता. कल्लू केवट असं या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातला आहे. लाडू विकताना तो अतिशय मस्त शैलीत गाणं म्हणतोय. त्याचं गाणं ऐकून तुम्हालाही लाडू खावासा वाटेल, हे नक्की…

ट्विटरवर शेअर

हा व्हिडिओ नितीन शर्मा नावाच्या व्यक्तीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला असला, तरी आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी तो रिट्विट केला आहे. नितीन शर्मानं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की मध्य प्रदेशातल्या कल्लू केवटची लाडू विकण्याची अनोखी पद्धत… तर दीपांशू काबरा यांनी व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय,की ‘आमच्या देशात महान कलाकार आहेत. गाणं ऐकून लाडू खावेसे वाटले.

शेकडो लोकांनी व्हिडिओला केलं लाइक

यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये असंही लिहिलंय, की ‘तुम्ही ही धून ओळखली का? कृपया ट्विट करून सांगा. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की फेविकॉल के अॅड की धुन है सर!’, तर दुसऱ्या यूझरनं म्हटलंय, की हे राज कपूरच्या ‘दिल का हाल सुने दिल वाला’ चित्रपटाचं गाणं आहे. प्रत्यक्षात तो फेव्हिकॉलच्या अॅडचा सूर असला तरी. या व्हिडिओला आतापर्यंत 4 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइकही केलं आहे.

Viral : ‘पूर्ण कपडे घाल, नाहीतर फ्लाइटमध्ये येऊ देणार नाही’, विमान कंपनीच्या वागणुकीवर मॉडेल भडकली

Video : कुत्र्याची इतकी जबरदस्त झेप तुम्ही कधी पाहिली नसेल? वाटतं, तो हवेत उडतोय..!

Viral Video: भंगार बापाची पैदास… तुह्या बापाला जाळ ना; इंदोरीकरांचा हा ‘रावण’ 12 मिनिटं ऐका, पुन्हा ‘रावणदहन’ करणार नाही!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें