Video : कुत्र्याची इतकी जबरदस्त झेप तुम्ही कधी पाहिली नसेल? वाटतं, तो हवेत उडतोय..!

सोशल मीडियावर कुत्र्यांशी संबंधित सर्व प्रकारचे व्हायरल व्हिडिओ (Viral Video) पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा नेत्रदीपक स्टंट (Stunt) करताना दिसतोय.

Video : कुत्र्याची इतकी जबरदस्त झेप तुम्ही कधी पाहिली नसेल? वाटतं, तो हवेत उडतोय..!
कुत्र्याची उडी

जगात असे अनेक प्राणी (Animals) आहेत, ज्यांना बुद्धिमान प्राण्यांपैकी एक मानलं जातं, कारण ते काहीही शिकवलं की पटकन शिकतात. यामध्ये कुत्र्यां(Dogs)चं नाव अग्रस्थानी घेता येतं. तो सर्वच गोष्टी खूप लवकर शिकतो. त्यामुळे लष्करातही कुत्री पाळली जातात. जर तुमच्याकडे पाळीव कुत्रा असेल तर तुम्हाला हे चांगलं माहीत असेल. जर नसेल तर तुम्ही सोशल मीडियावर कुत्र्यांशी संबंधित सर्व प्रकारचे व्हायरल व्हिडिओ (Viral Video) पाहिले असतील. यामध्ये लोक कुत्र्याशी खेळतात, उठतात आणि बसतात, त्यांना खायला शिकवतात. अनेक जण आपल्या कुत्र्यांना स्टंट करायला शिकवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा नेत्रदीपक स्टंट (Stunt) करताना दिसतोय.

असं वाटतं, की तो हवेत उडतोय

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक कुत्रा दुरून धावत येतो आणि समुद्रात उडी मारतो. त्याची उडी पाहून असं वाटतं, की तो हवेत उडतोय आणि दूरवर उडत असतानाच तो पाण्यात उतरतो. त्याचा तोल आणि उडी मारण्याचा वेग नजरेत भरतो. हा अप्रतिम व्हिडिओ आहे. कुत्र्याची इतकी जबरदस्त झेप तुम्ही याआधी क्वचितच पाहिली असेल.

ट्विटरवर शेअर

हा नेत्रदीपक आणि जिवंत व्हिडिओ @buitengebieden_ या नावानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि ‘हा कुत्रा उडत आहे…’ असं कॅप्शन लिहिलं आहे. खरं तर कुत्र्याची उडी पाहून तुम्हालाही तसंच वाटेल.

‘ती झेप किती दूर होती?’

अवघ्या 25 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाख 18 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 26 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर उत्तम कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलं आहे, की ‘ती झेप किती दूर होती?’, तर दुसऱ्या यूझरनं ‘त्या कुत्र्याला भीती नाही’ अशी कमेंट केली आहे. त्याचप्रमाणं इतरही अनेक यूझर्स कुत्र्याला उडी मारताना पाहून आश्चर्यचकित झाले असून वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

Viral Video: भंगार बापाची पैदास… तुह्या बापाला जाळ ना; इंदोरीकरांचा हा ‘रावण’ 12 मिनिटं ऐका, पुन्हा ‘रावणदहन’ करणार नाही!

Viral Video : देशाचे पंतप्रधान लालू प्रसाद यादव! मुलाचा आत्मविश्वास पाहून आयपीएस अधिकारीही थक्क!!

Viral : हेल्मेटचं महत्त्व जाणून घ्या फक्त 6 सेकंदात! IPS अधिकाऱ्यानं शेअर केला Video

Published On - 5:00 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI