Viral Video : देशाचे पंतप्रधान लालू प्रसाद यादव! मुलाचा आत्मविश्वास पाहून आयपीएस अधिकारीही थक्क!!

एका मुलाचा व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होतोय, जो पाहून आयपीएस (IPS)अधिकारीही थक्क झाले आहेत. या व्हिडिओमध्ये हे मूल एका पत्रकारा(Reporter)च्या प्रश्नांना मोठ्या आत्मविश्वासानं उत्तर देताना दिसत आहे.

Viral Video : देशाचे पंतप्रधान लालू प्रसाद यादव! मुलाचा आत्मविश्वास पाहून आयपीएस अधिकारीही थक्क!!
पत्रकाराच्या प्रश्नांना आत्मविश्वासानं उत्तर देणारा मुलगा

एका मुलाचा असा व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होतोय, जो पाहून आयपीएस (IPS)अधिकारीही थक्क झाले आहेत. या व्हिडिओमध्ये हे मूल एका पत्रकारा(Reporter)च्या प्रश्नांना मोठ्या आत्मविश्वासानं उत्तर देताना दिसत आहे. रिपोर्टरलाही त्याच्या उत्तरानं त्याचं कौतुक वाटतंय.

आत्मविश्वासानं उत्तरं

व्हिडिओमध्ये एक रिपोर्टर मुलाला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. त्याचबरोबर मुलगा ज्या प्रकारे पूर्ण आत्मविश्वासानं प्रश्नांची उत्तरं देत आहे ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. देशाचे पंतप्रधान म्हणून लालू यादव यांचं नाव हा मुलगा मोठ्या आत्मविश्वासानं घेतं. मुलाचे मजेशीर उत्तर ऐकून तिथे उभ्या असलेल्या लोकांनाही मजा येते.

आवडत्या सब्जेक्टवर काय म्हणाला?

लहान मुलानं ज्या मजेशीर पद्धतीनं प्रश्नांची उत्तरं दिली ते ऐकून तुम्हालाही हसू फुटेल. व्हिडिओमध्ये तुम्ही मुलाचा आत्मविश्वास बघाल आणि म्हणाल, की या मुलाला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे. सर्व प्रथम रिपोर्टरनं मुलाला विचारलं, तुला कोणता सब्जेक्ट अधिक आवडतो. त्यावर मुलानं ‘सब्जी’ ऐकलं आणि उत्तर दिलं – वांगी. हे उत्तर ऐकून सगळे हसायला लागले. आता हा व्हिडिओ पाहू या…

अभ्यासात रमतं मन?

यानंतर रिपोर्टरनं मुलाला विचारलं, की तुला कोणती इंग्लिश Poem आठवतो का? यावरही मुलानं खूप मजेशीर उत्तर दिले. यानंतर रिपोर्टर मुलाला म्हणाला, की तुझं अभ्यासात मन रमतं का? तर प्रत्युत्तरात मुलगा म्हणाला, ‘हो रमतं.’ शेवटी रिपोर्टरनं मुलाला देशाच्या पंतप्रधानांचं नाव विचारले. यानंतर मुलानं आधी नितीश कुमार देशाचे पंतप्रधान असल्याचं सांगितलं.

ट्विटर अकाऊंटवर शेअर

मात्र, काही क्षणातच मुलाने देशाच्या पंतप्रधानांचे नाव बदलून लालू यादव असं केलं. यानंतर शेवटी मुलानं सांगितलं, की देशाच्या पंतप्रधानांचं नाव मोदी आहे. रिपोर्टरनं पूर्ण नाव विचारल्यावर मुलानं मोदी सरकार असं मजेशीर उत्तर दिलं. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. लोकांना व्हिडिओ खूप आवडतोय.

Viral : हेल्मेटचं महत्त्व जाणून घ्या फक्त 6 सेकंदात! IPS अधिकाऱ्यानं शेअर केला Video

Viral Video : 24 कॅरेट सोन्याचं आईस्क्रीम कधी खाल्लंय का? कुठे आणि किती रुपयांना मिळतं? चला पाहू या…

Viral : म्हशीची छेड काढली आणि धपकन् तोंडावर आपटली महिला, पाहा Video

Published On - 2:41 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI