Viral : म्हशीची छेड काढली आणि धपकन् तोंडावर आपटली महिला, पाहा Video

अनेकदा लोक आपल्या मौजमजेसाठी इतरांना त्रास देताना दिसतात. 'विनाकारण कोणालाही त्रास देऊ नये, असं म्हणतात. एक महिला गंमत म्हणून म्हशी(Buffalo)ला त्रास देत होती. मात्र, त्याचा परिणाम काय झाला हा सर्वांसमोर आला.

Viral : म्हशीची छेड काढली आणि धपकन् तोंडावर आपटली महिला, पाहा Video
तोंडावर आपटली महिला

अनेकदा लोक आपल्या मौजमजेसाठी इतरांना त्रास देताना दिसतात. ‘विनाकारण कोणालाही त्रास देऊ नये, असं म्हणतात. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतातच. सोशल मीडिया (Social Media) हे एक व्यासपीठ आहे, जिथं प्रत्येक व्हिडिओमधून अनेकदा काहीतरी धडा शिकायला मिळतो. आता या प्रकारातला एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral)होतोय. एक महिला गंमत म्हणून म्हशी(Buffalo)ला त्रास देत होती. मात्र, त्याचा परिणाम काय झाला हा सर्वांसमोर आला. व्हिडिओमध्ये त्या महिलेला अशी अद्दल घडते, की सगळेच आश्चर्यचकित होतात.

सोशल मीडियावर व्हायरल

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लोक यावर जोरदार चर्चा करत आहेत. इंटरनेटवर असे सर्व व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. हे व्हिडिओ असे आहेत, की काही सोशल मीडिया यूझर्स बघून आश्चर्यचकित होतात तर काही हसतच राहतात. आता आम्ही ज्या व्हिडिओबद्दल बोलत आहोत त्याचाही यातच समावेश होईल. तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्हीही या बातमीतला हा व्हिडिओ पाहू शकता.

उडी मारताना पडली ती महिला

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक म्हैस उभी असलेली दिसतेय. त्याचवेळी एक महिला तिच्याजवळ उभी राहून तिची छेड काढत आहे. कधी ती म्हशीला हातानं मारण्याचा प्रयत्न करते, कधी पाय लावते. हे करताना त्या महिलेला खूप मजा येतेय. कहत तर तेव्हा होतो, जेव्हा, काही वेळानं ती महिला म्हशीवर बसण्याचा प्रयत्न करते. पण, म्हशीने डोकं मागं खेचते आणि मग त्या महिलेचं काय होतं, हे पाहण्यासारखं आहे.


एकदा तरी हसालच

आलं ना हसू? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एकदा तरी हसू आलं असेलच. यातून काहीतरी शिकण्यासारखंदेखील आहे. विनाकारण कोणालाही त्रास देऊ नये. मुक्या प्राण्यांना तर नाहीच. यूझर्सनाही हा व्हिडिओ इतका आवडला, की ते तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत. तो सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर शेअर केला जातोय. हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ ‘Nirmala Vaishnav’ नावाच्या पेजवर पाहू शकता. आतापर्यंत 70 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

गाईचं दूध काढण्यासाठी महिलेची अनोखी शक्कल, देशी जुगाडचा Video Viral

Viral Video : स्विमिंग पुलाजवळ अंघोळीसाठी बसलंय अस्वल, लोक म्हणतायत आम्हीही येतो..!

आमदार धीरज देशमुख यांचं ‘शेतामंदी मन रंगलं’, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Published On - 10:53 am, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI